धारदार तलवारीनी केक कापुन व्हॉटस्‌अप स्टेटस ठेवणाऱ्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे : सार्वजनिक ठिकाणी थांबून धारदार तलवारीनी केक कापुन वाढदिवस करणा-याना दत्तवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच तलवारी व कोयते बनवून गुन्हेगारांना त्याचा पुरवठा करणाऱ्यालाही पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे हत्यारांचा वापर करणाऱ्या व त्यांची विक्री करणाऱ्यांना चांगलीच जरब बसण्याची शक्‍यता आहे.

रितेश बाळु पायके (वय 19 वर्षे, रा.गल्ली नं. ७४, जनता वसाहत, राम मंदिराजवळ, पुणे) आदित्य संजय नलावडे (वय 19वर्षे, रा. गल्ली नं. ७७, जनता वसाहत, राम मंदिराजवळ, पुणे), प्रेम योगेश पवार (वय 24, रा. नवीआळी झोपडपट्टी , भोर ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

पुणे शहरात गुन्हेगार व युवक धारदार हत्यारांचा वापर करुन वाढदिवसांचे केक सार्वजनिक ठिकाणी धारदार हत्यारानी कापुन सर्व सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करु नयेत या अनुषांगाने वरिष्ठ पोलीस अधिका-यांकडुन वेळोवेळी प्राप्त सुचनानुसार दत्तवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  कृष्णा इंदलकर व पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे यांनी दत्तवाडी तपास पथकाला हद्दीतील झोपडपट्टया इतर वसाहती यातील उपद्रवी युवक व गुन्हेगार यांच्या व्हॉटसअप व इतर सोशल मिडिया ग्रुपवर येणा-या
गुन्हेगारी कृत्यांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते

त्यादरम्यान 6 ऑगस्ट रोजी दत्तवाडी पोलीस स्टेशनकडील तपासपथक अधिकारी व कर्मचारी हे हद्दीत गस्त करीत असताना पोलीस अमंलदार विष्णु सुतार,शरद राऊत व राहुल ओलेकर यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, “काही दिवसापूर्वी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्यानंतर त्याची छायाचित्रे व्हॉटसअप स्टेटसला ठेवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न जनता वसाहतीमधील काही तरुणांकडून केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संबधीत तरुण हे जनता वसाहतीतील राम मंदिराजवळ हातामध्ये शस्त्र घेऊन थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी रितेश पायके व आदित्य नलावडे या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून तलवारी जप्त केल्या.

त्यांच्याकडे येणाऱ्या तलवारी व कोयत्यांसारखी धारदार शस्त्रे कोठून येतात, याबाबत पोलिसांनी कसून चौकशी केली. दरम्यान, शस्त्र तयार करून तो पुरवठा करणारा व्यक्ती जनता वसाहतीमध्ये येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून योगेश पवार यास अटक केली.सदर तीन्हीही आरोपीविरुध्द दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली असुन त्यांचेकडुन एकुण ७ प्राणघातक धारदार हत्यारे पोलिसांनी जप्त केली. आरोपींनी चोरलेल्या गाडीच्या पाट्यापासून पवारने त्यांना हत्यारे बनवून दिले होते.

सदरची कारवाई ही अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, डॉ.संजय शिंदे, पोलीस उप- आयुक्त सो परि. ३ मा. पौर्णिमा गायकवाड, सहा. पोलीस आयुक्त सिंहगड विभाग पोर्णिमा तावरे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर व पोलीस निरिक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक स्वप्नील लोहार, पो. हवा. कुंदन शिंदे, राजू जाधव, पो. अं. शिवाजी क्षीरसागर, नवनाथ भोसले, अमित सुर्वे, विष्णु सुतार, शरद राऊत, राहुल ओलेकर, भरत आस्मर, अक्षयकुमार वाबळे, प्रमोद भोसले यांनी केली आहे

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.