पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची कारवाई ! पुण्यातील बंडगार्डन परिसरात प्रवाशांची लुटमार करणा-या टोळीविरूध्द ‘ मोक्का
पुणे : बंडगार्डन पोलीस स्टेशन परीसरात प्रवाशांची लुटमार करणा-या गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोक्का) (Mokka) कारवाई (Crime) करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली “मोक्का’ची ४१ वी कारवाई आहे.
टोळीप्रमुख अल्ताफ ऊर्फ बचक्या इक्बाल पठाण, सागरऊर्फ पार्थ ज्ञानेश्वर भांडे, मोहरम ऊर्फ सम्या शफी शेख, शहाबाज ऊर्फडी शरीफ नदाफ , राजेश मंगल मंडल ऊर्फ चौपाट्या, इमामज लालउद्दीन सय्यद, महादेव ऊर्फ महादेव गौतम थोरात, अलिशान ऊर्फ अली रफिक शेख, जय ऊर्फ नन्या ऊर्फ विलास तुपे अशी “मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
मोक्काची कारवाई करण्यात आलेल्या आरोपींनी पुणे स्टेशन येथून २६ जून रोजी पहाटे ४ ते ४.२० वाजताच्या दरम्यान एका प्रवाशाला वाघोली येथे घेऊन जाण्याच्या बहाण्याने रिक्षात बसविले. थोड्या अंतरावर गेल्यावर आणखी आरोपी रिक्षामध्ये बसले. ती रिक्षा मालधक्का चौकाकडे नेऊन आरोपींनी रिक्षात बसलेल्या प्रवाशाला मारहाण केली. त्याच्यावर चाकूने वार करून त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाईल चोरून नेला होता. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये टोळी प्रमुखासह वरील आरोपींना अटक केली आहे.आरोपींचा सखोल तपास केला असता टोळी प्रमुख अल्ताफ पठाण याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने वरील गुन्हा केला आहे.
आरोपींनी त्याच्या टोळीचे वर्चस्व कायम टिकवण्यासाठी व पुणे स्टेशन येथे येणारे जाणारे प्रवाशांची लुटमार करुन पुणे स्टेशन परीसरात दहशत निर्माण करून स्वतःचा व टोळीचा आर्थिक फायदा मिळवण्याच्या उद्देशाने तसेच टोळीचे वर्चस्व राखण्यासाठी टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांनी बंडगार्डन पोलीस ठाणेचे हद्दीमध्ये गंभीर गुन्हे केलेले आहेत.
तसेच आरोपींनी संघटीत गुन्हेगारी टोळी निर्माण करून, काही गुन्ह्यांमध्ये वेगवेगळे आरोपी घेऊन नवीन संघटीत टोळी तयार करून एकट्याने व संयुक्तरित्या स्वतःचे व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी व त्यातुन गैरवाजवी, आर्थिक फायदा मिळविण्याकरीता गुन्हे केलेले आहेत व वेगवेगळ्या आरोपींना घेऊन त्याची संघटना वाढविण्याचे प्रयत्न चालु केलेले आहेत. आपल्या टोळीचे वर्चस्व व दहशत कायम ठेवण्याच्या उददेशाने खुन, दरोडा, दोरड्याची तयारी करणे, मृत्यु किंवा जबर दुखापत घडवुन आणण्याच्या प्रयत्ना सहित जबरी चोरी किंवा दरोडा, जबरी चोरी करताना इच्छापुर्वक दुखापत करणे, अपहरण, विनयभंग, घरफोडी, दुखापत, चोरी, गैरकायद्याची मंडळी जमविणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे इत्यादी सारखेगु न्हेगारी कृत्य आरोपींनी सातत्याने केलेले असल्याने त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वरील गुन्ह्याचा पुढील तपास लष्कर विभागाचे सहा. पोलीस आयुक्त चंद्रकांत सांगळे करीत आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही ४१ वी कारवाई आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!