पुण्यात तरुणावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या टोळी प्रमुखासह तिघांना अटक

पुणे  : पुणे शहरातील स्वारगेट परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला करुन फरार झालेल्या  टोळी प्रमुखासह तिघाजणांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना स्वारगेट हद्दीमध्ये डायस्प्लॉट भागात घडली होती. परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने युवकावर प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

टोळी प्रमुख गोविंदसिंग टाक (रा. डायस्प्लॉट गुलटेकडी), राहुल उर्फ लल्लन कांबळे, गणेश तुपे (दोघे रा. मंगळवार पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.

तरुणावर खूनी हल्ला करुन फरारी टोळी प्रमुखासह साथीदारांची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ आणि पथकाकडून घेण्यात येत होती. त्यावेळी पोलीस शिपाई ज्ञाना बडे व मनोज भाकरे यांना आरोपींची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी दाखल गुन्ह्याची कबुली दिली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.