पुण्यात सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीला अटक
पुणे : पुणे शहरातील येरवडा परिसरात राहणाऱ्या विवाहितेने सासरच्या व्यक्तींकडून सातत्याने होणार्या मानसिक व शारिरीक त्रासाला कंटाळून विवाहीत महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी विवाहितेच्या वडीलांनी महिलेच्या पतीसह सासू, सासरे यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
स्वप्निल रमेशचंद्र बाफना (३४ रा. रामवाडी गावठाण, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत महिलेचे वडील संजय संचेती (५८, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,मे २०१३ मध्ये फिर्यादी यांची मुलगी रेणू हिचे स्वप्निल बाफना याच्याशी लग्न झाले होते. तेव्हापासून ते रामवाडी गावठाण परिसरात एकत्र राहत होते. परंतु मागील काही दिवसांपासून महिलेची सासू- सासरे तिला मानसिक त्रास देत होते. माहेरी निघून जा असे सांगत सासूने तिला शिवीगाळ करून मारहाण केली. सततच्या जाचाला कंटाळून तिने शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!