बॉम्ब ठेवल्याच्या अफवेमागचं सत्य उघड ; गटारीची पार्टी करताना मद्यधुंद अवस्थेत मुंबई पोलिसांना केले हॉक्स कॉल, दोघे ताब्यात
मुंबई : काल रात्री उशीरा रेल्वे विभागाला एका निनावी फोन प्राप्त झाला होता. फोनवरील व्यक्तीनं मुंबईतील सीएसएमटी, दादर, भायखळा आणि अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवल्याची माहिती देण्यात आली होती.या माहितीनंतर मुंबई पोलिसांसह बॉम्ब शोधक पथकाची झोप उडाली आहे. त्यांनी रात्रभर संबंधित सर्वठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली आहे. मात्र पोलिसांना कुठेही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
या प्रकरणाची माहिती आता समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्टेशन, दादर रेल्वे स्टेशन आणि बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या पश्चिम उपनगरातील बंगल्यावर बॉम्ब असल्याचा दावा करणाऱ्या दोन मद्यधुंद इसमांनी खोटे कॉल करुन मुंबई पोलिसांनी झोप उडवली. राजू अंगारे आणि रमेश शिरसाट अशी या दोघांची नावं आहेत. सर्वात आश्चर्याची बाब अशी कि, या दोघांनी असा दावा केला की मुंबई पोलीस किती सतर्क आहेत हे तपासण्यासाठी त्यांनी हा कॉल केला होता.
आरोपी तरुणांनी गटारी पार्टीत धुंद असताना पोलिसांना फोन करून ही खोटी माहिती दिल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. आरोपींनी तरुणांनी पोलिसांना फोन करून त्यांना कामाला लावल्यानंतर फोन बंद करून ठेवला होता. त्यामुळे नक्की भानगड काय आहे? हे पोलिसांना देखील माहीत नव्हतं त्यामुळे मुंबई पोलिसांसह बॉम्ब शोधक पथकानं संबंधित ठिकाणी रात्रभर शोधमोहीम राबवली आहे. दारू पिऊन नको ते कृत्य केल्यानं पोलिसांना देखील बराच मनस्ताप सहन करावा लागला आहे.
मुंबई पोलीस किती सतर्क आहेत, हे तपासण्यासाठी आम्ही हा फोन केला होता, असा दावा आरोपी तरुणांनी केला आहे. तरुणांच्या एका फोनमुळे मुंबई पोलिसांची सर्व यंत्रणा कामाला लागली होती. पोलिसांनी दोन्ही आरोपींनी ठाणे परिसरातून अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींना जेव्हा ताब्यात घेतलं तेव्हा दोघंही मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आपण गंमत म्हणून हा खोटा फोन केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!