मोठी बातमी: ‘जॉन्सन’च्या सिंगल डोस लशीच्या वापराला भारतात मंजुरी

नवी दिल्ली :कोरोना विरोधातील लढ्यात भारताला आणखी बळ मिळणार आहे. कारण, अमेरिकन फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या  सिंगल डोस लशीच्या आपात्कालीन वापरासाठी भारतात मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे. भारतात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी वापरण्यात या लशीचा वापर महत्त्वाचा ठरेल. भारतामध्ये मंजुरी देण्यात आलेलं हे पाचवं व्हॅक्सिन आहे. संपूर्ण जगभरात व्हॅक्सिनच्या साहाय्याने कोरोनाविरोधातील ही लढाई लढली जात आहे. 130 कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारतात आतापर्यंत 49.53 कोटीपेक्षा अधिकांना व्हॅक्सिन देण्यात आले आहे

जॉन्सन अँड जॉन्स कंपनीने लशीच्या आपत्कालीन वापरासाठी भारताकडे मंजुरी मागितली होती. भारत सरकारने जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लशीला भारतातील वापराला मंजुरी दिली आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने ट्विट करुन दिली आहे.

सध्या देशात कोव्हॅक्सिन व कोव्हिशिल्ड या दोन भारतीय लशींच्या व्यतिरिक्त रशियाची स्पुटनिक ही लस उपलब्ध आहेत. यामध्ये जॉन्सन अँड जॉन्सच्या लशीची भर पडली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.