मौजे म्हाळुगेमध्ये 18 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
पुणे : खेड तालुक्यातील मौजे म्हाळुगे येथील एका 18 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनिता विष्णु होलम (वय, 18) असं आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.तिच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील मौजे म्हाळुगे या गावातील अनिता होलम या तरुणीचा मृतदेह नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नायलॉनच्या दोरीने गळफास लावलेल्या अवस्थेत सकाळी 11 वाजेच्या सुमारास आढळून आला आहे. या घटनेची माहिती नितीन विष्णू होलम यांनी खेड पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू नोंद केली आहे.
दरम्यान, मृत अनिताने घरी कोणी नसल्याचे पाहून आपला जीव घालवला आहे. अशी एका एक आत्महत्या का केली यावरून परिसरात हळहळ व्यक्त होते. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी अधिक तपास खेड पोलीस करीत आहेत
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!