इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार आणि गर्भपात

पिंपरी चिंचवड  : इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीला 21 वर्षीय तरुणाने अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे अल्पवयीन पीडित मुलगी गरोदर राहिली.त्यानंतर आरोपी तरुणाने गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला. हा प्रकार मागील दीड वर्षांपासून एक ऑगस्ट 2021 या कालावधीत घडला.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमेश गजानन सोनवणे (वय 21, रा. अंमळनेर, जि. धुळे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणीnपीडित अल्पवयीन मुलीच्या आईने शनिवारी (दि. 7) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 17 वर्षीय मुलगी आणि आरोपी उमेश यांची मागील दीड वर्षांपूर्वी इंस्टाग्रामवर ओळख झाली. त्यानंतर उमेशने मुलीसोबत मैत्री केली. उमेशने अल्पवयीन मुलीला फूस लावल्याने ती अनेक वेळा त्याच्याकडे अंमळनेर येथे गेली होती. 27 जुलै रोजी पिडीत मुलगी घरातून निघून जाऊन आरोपीकडे अंमळनेर येथे गेली.तेथे तिने विषारी औषधाच्या गोळ्या खाल्या. तेथे तिला हॉस्पिटल मध्ये अॅडमीट केले होते व त्यानंतर महिला सेवाग्राम पुणे येथे अॅडमीट केले आहे. व तेथे अधिक्षक यांनी तिची चौकशी केली व अध्यक्षा बालकल्याण समीती यांना पत्र दिले व त्यामध्ये सदर दोघांच्यात शरीरसंबंध होत होते व ती दोन महिन्यापुर्वी गर्भवती झाली होती व उमेश याने तिला गोळ्यादेऊन तिचा गर्भपात केल्याची हकिकत सांगीतली आहे व त्यांनी गुन्हा दाखल करण्याबाबत पोलीसांना पत्र दिले आहे. त्यावरुन फिर्यादी यांना सदर हकिकत समजली व मुलगी हि विषारी गोळ्या खाल्या. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.