कोल्हापूरात ‘सैराट’ ! प्रेमविवाह केल्याचा रागातून सख्या भावाचा बहिणीवर विळ्याने हल्ला 

 

कोल्हापूर  : प्रेम विवाह केल्याच्या रागातून सख्या भावाने विवाहित बहिणीवर धारदार विळ्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना पन्हाळा येथील तीन दरवाजा च्या पायथ्याशी असणाऱ्या गुडे या गावात शुक्रवारी (दि.६) सकाळी घडली.सख्ख्या भावाकडून शांत डोक्‍याने झालेल्या कृत्याने गुढे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी पन्हाळा पोलिसांनी दोन तासात संशयित नागेशला निगवे येथील घरातून ताब्यात घेतले.

या प्रकरणी नागेश पांडुरंग तेली (वय 20, रा. निगवे दुमाला ता. करवीर) याला पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या बाबत जखमी विश्रांती अविनाश चिखलकर (23, रा. गुढे ता. पन्हाळा) यांनी पन्हाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पन्हाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,विश्रांती चिखलकर हिने गुडे गावातील अविनाश चिकलकर याच्याशी प्रेम विवाह केला आहे.याचा राग अनावर झाल्याने विश्रांतीचा सख्खा भाऊ नागेश  याने गुडे येथे येऊन विश्रांती हिच्या पाठीत व उजव्या हातावर गंभीर दुखापत झाली आहे. तिला पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

सख्ख्या भावाकडून शांत डोक्‍याने झालेल्या कृत्याने गुढे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.हा हल्ला सकाळी दहाला झाला. गुढेचे पोलिसपाटील केशव कदम यांनी पन्हाळा पोलिस ठाण्यात वर्दी दिली.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटना घडल्या पासून दोन तासात सापळा लावून संशयित आरोपीस निगवे येथील घरातून ताब्यात घेतले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक डोईफोडे हे करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.