पुण्यातल्या लॉकडाऊनमध्ये अखेर शिथिलता, शहरातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार

पुणे : पुण्यात लागू असलेल्या निर्बंधांमधून पुणेकरांना कोणतीही सुट मिळाली आहे.कारण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोरोना आढावा बैठकीत निर्बंधांमध्ये मोठी शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पुण्यातील दुकाने आणि हॉटेल्स सुरु ठेवण्याची वेळ वाढवण्यात आली आहे  दुकावे सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत तर हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरु  सुरु राहणार आहे.  पुण्यातील निर्बंध शिथील करण्याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

पुण्यातील सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरु राहणार तर हॉटेल्स रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात शनिवारी आणि रविवारी सर्व सेवांना दुपारी चारपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मॉल्सदेखील सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजेपर्यंत सुुर ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश दिला जाणार आहे. 13 तालुक्यात लेव्हल तीनची नियमावली सोमवारपासून लागू केली आहे. ग्रामीणचा दर 5.5 आहे. पण तिथे लेव्हल 4 ऐवजी 3 ठेवली आहे.

 

पुण्यात काय सुरु काय बंद?

  • पुण्यातील सर्व दुकानं एक दिवस वगळता सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी
  • पुण्यातील हॉटेल-रेस्तराँ सर्व दिवस रात्री 10 पर्यंत सुरु ठेवता येणार
  • मॉल रात्री 8 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  • मॉल्समध्ये फक्त दोन लस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार
  • हॉटेल चालक आणि दुकानदारांना लशीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक
  • पुण्यातील सर्व उद्यानं नियमित वेळेनुसार सुरु राहणार
  • जलतरण तलाव वगळता इतर आऊटडोअर खेळांना परवानगी
  • सात टक्क्यांच्या पुढे पॉझिटिव्हीटी रेट गेल्यास पुन्हा निर्बंध लागणार
  • पुणेकरांना मास्क वापरणं बंधनकारक

अजित पवारांच्या उपस्थितीत आढावा बैठक

पुण्यातील व्यापारी आणि लोकप्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. पुण्यात कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली असली तर शहरातील पॉझिटिव्हिटी रेट 7 टक्क्यांच्या वर गेल्यास सर्व शिथिलता मागे घेतली जाणार असल्याचा इशारा अजित पवार यांनी यावेळी दिला. तसंच सरकारनं घालून दिलेले सर्व नियम पाळण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. दुकानदार, त्यांचे कर्मचारी त्यांनी मास्क वापरणं बंधनकारक असणार आहे.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या 13 तालुक्यांसाठी लेवल 3 चे निर्बंध लागू असणार आहेत. सोमवारपासून हे नियम लागू असतील. काही लोकप्रतिनिधींनी ग्रामीण भागातही शिथिलता देण्याची मागणी केली होती. मात्र, ग्रामीण भागातील पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्यामुळे 13 तालुक्यात लेवल 3 चे निर्बंध लागू असणार आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.