मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8 वाजता जनतेशी संवाद साधणार; महत्त्वाची घोषणा करणार?
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (8 ऑगस्ट 2021 ) रात्री 8 वाजता महाराष्ट्रातील जनतेशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहे. राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव काहीसा कमी झालेला पाहायला मिळतोय. अशावेळी राज्यातील 25 जिल्हातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तर 11 जिल्ह्यात अद्यापही लेवल 3 चे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. तसेच राज्यातील निर्बंध शिथिल होणार का? झाला तर कुठे कुठे होईल? याबद्दल उद्धव ठाकरे एखादी महत्त्वाची घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे
कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबई लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी अशी आक्रमक मागणी आता होत आहे. भाजपसह अन्य विरोधी पक्ष आणि रेल्वे प्रवासी संघटनांकडून या मागणीसाठी आंदोलनही करण्यात येत आहे. तर व्यापारी वर्गही राज्य सरकारकडे शिथिलता देण्याची मागणी करत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री जनतेशी काय संवाद साधणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हॉटेलच्या वेळेत वाढ होणार?
बार अँन्ड रेस्टॉरंट यांची 4 वाजेपर्यंतची वेळ ठेवली. तीच वेळ कायम ठेवल्याने बार अँन्ड रेस्टॉरंट असोशिएशनद्वारे नाराजी व्यक्त होत आहे. बार अँन्ड रेस्टॉरंट यांची वेळ वाढवून देण्याची मागणी व्यावसायिकांकडून होत आहे.
व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार?
राज्यातील व्यापारी संघटनेने व्यापार, दुकाने सुरु ठेवण्याच्या वेळेत वाढ करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री त्याबद्दल काय निर्णय घेतील, याकडेही व्यापाऱ्यांचे लक्ष आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!