शेजारच्या तरुणाकडून वारंवार होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीची आत्महत्या

बीड : शेजारच्या तरुणाकडून सततच्या छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडच्या पाटोदा तालुक्यात असणाऱ्या चुंबळी गावांमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी उच्चशिक्षित अभियंता तरुणाला अटक केली आहे.

उमेश आश्रुबा क्षीरसागर (वय 30) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरुद्ध छेडछाड आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,चुंबळी येथील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह, घरात गळाफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पाटोदा पोलीस ठाण्याचे एपीआय महेश आंधळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी नातेवाईकांसह मुस्लिम समाजातील नेत्यांनी, गावातील तरुणाने तिच्यावर अत्याचार करून तिला फासावर लटकवले. असा आरोप केला होता. त्यामुळे मृत मुलीचे शवविच्छेदन अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात पाच डॉक्टरांच्या टीमने केले आहे. मात्र त्यामध्ये काहीच आढळून आले नाही.

तर, याप्रकरणी मुलीच्या पित्याने रात्री पोलीसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, घरातील सर्वजण बाहेरगावी लग्नासाठी गेलो होतो. घरी परतल्यानंतर मुलगी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. गावातील एका तरुणाकडून मयत मुलीसह तिच्या बहिणीची वारंवार छेड काढली जात होती. यापूर्वी त्या तरुणाने अश्लील चाळे केल्याने गावातील नागरिकांनी त्याला समज दिली होती. त्यानंतर तो तरुण मुलीला जिवे मारण्याच्या धमक्या देत होता. या दिलेल्या फिर्यादीवरून उमेशला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.