व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला तलवारीचे फोटो आणि व्हिडीओ, ‘कात्रजकिंग’ला पोलिसांनी दिला चांगलाच दणका!

पुणे : व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला तलवारीचे फोटो आणि व्हिडीओ ठेऊन स्वतःला कात्रजकिंग म्हणविणाया तरूणाला पोलिसांनी अटक केली. संबंधित व्हिडिओत त्याने पोलिसांना आव्हान देउन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अतुल थोरात असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

अतुल थोरात या तरुणाने आपल्या व्हॉट्सऍप स्टेटसवर तलवारसह काढलेले फोटो ठेवले होते. तसेच स्टेटसवर एक व्हिडीओ टाकून त्याने थेट पोलिसांना आव्हान दिले होते. अतुल कात्रज स्मशानभूमीजवळ असल्याची माहिती पोलीस अमंलदार विक्रम सावंत यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना पाहून आरोपी अतुलने पळू काढला. पथकाने पाठलाग करून अतुल थोरात याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, रवींद्र भोसले, रवींद्र चिप्पा, सचिन पवार, योगेश सुळ, गणेश शेंडे, राहूल तांबे, सचिन गाडे, आशिष गायकवाड, विक्रम सावंत यांनी केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.