सख्खा भाऊ पक्का वैरी! जमिनीच्या वादातून भावाची हत्या, शिरूर हादरलं
पुणे : जमिनीच्या वादातून शिरूर तालुक्यातील कवठे येमाई सख्ख्या भावानेच भावाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. या खून प्रकरणामे परिसर हादरून गेला आहे. याप्रकरणी तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि.8) सकाळी साडे आकराच्या सुमारास घडली.
भाऊ राणू जाधव (वय 56, रा. कवठे येमाई ता. शिरूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर रानु जाधव, पुष्पा बाबाजी जाधव व शितल रानु जाधव (सर्व रा. शितोळे वस्ती, कवठे येमाई, ता. शिरुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी भाऊ जाधव यांचा मुलगा संतोष भाऊ जाधव याने शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवार (दि.8) रोजी कवठे येमाई गावच्या हद्दीतील माळीमळा रोडवर जमिनीच्या कारणावरून भाऊ रानु जाधव यांना बाबाजी रानू जाधव, पुष्पा जाधव, शितल जाधव यांनी लाकडी दांडक्याने गंभीर दुखापत केली होती. या दुखापतीत गंभीर मार लागल्याने भाऊ याचा मृत्यू झाला होता.
याबाबत शिरूर पोलिस स्टेशनला मुलगा संतोष जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.शिरूर पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर शिरूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींचा शोध घेत मुख्य आरोपी बाबाजी रानू जाधव यास अटक केली.
हा तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे, सहायक फौजदार नजिम पठाण, पोलिस नाईक प्रवीण सांगळे, पोलिस नाईक कुडेकर, सुरेश नागलोत यांनी केला.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!