उद्योजक नानासाहेब गायकवाडसह मुलावर सावकारीचा आणखी एक गुन्हा दाखल

पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) उद्योगपती नानासाहेब शंकरराव गायकवाड आणि गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड या पिता-पुत्रावर कारवाई केल्यानंतर त्यांच्यावर आता चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात आणखी एक सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नानासाहेब शंकर गायकवाड, केदार उर्फ गणेश नानासाहेब गायकवाड (दोघे रा. औंध, पुणे), राजू दादा अंकुश उर्फ राजाभाऊ (रा. पिंपळे निलख) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.याबाबत स्वप्निल गणपतराव बालवडकर (36, रा. क्लोरीस रेसीडेन्सी, बालेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बालवडकर हे व्यावसायीक असून त्यांचे बुलेटचे शोरूम आहे. त्यांनी व्यावसायासाठी 2016 ते मे 2017 मध्ये 2 कोटी रूपये गायकवाड यांच्याकडून दोन टक्के व्याजाने घेतले होते. तसेच 2017 मध्ये 1 कोटी 4 टक्के व्याजाने घेतले होते. नंतर 2018 मध्ये 55 लाख 4 टक्के व्याजने दिले. तेव्हा त्याने व्याज जर वेळेवर दिले नाही तर जिवे मारण्याची धमकी दिली होती.

तसेच फिर्यादी यांनी आरोपींच्या सांगण्यावरून आरोपीचा मित्र धनेश माळी यांच्या खात्यावर 1 कोटी 10 लाख व गायकवाड यांच्या घरी जाऊन 3 कोटी 40 लाख रूपये रोख स्वरूपात दिले होते. यासर्व व्यवहारात गायकवाड यांनी बालवडकर यांची 8 गुंठे जमीन लिहून घेतली. तसेच सावकारी करताना त्यांनी व्याज रोख स्वरूपात घेऊन मुद्दल बँक खात्यावर घेतले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याधी नानासाहेब गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश
गायकवाड यांच्यावर जादूटोणा, सुनेवर अत्याचार तसेच
बेकायदा सावकारी अशा अनेक गुन्हे दाखल झाल्या मुळे गायकवाड पिता-पुत्रांचा आणि त्यांच्या साथिदारांचा सराईत गुन्हेगारामध्ये समावेश करुन त्यांच्यावर मोक्का कारवाई केली आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड, नानासाहेब शंकर गायकवाड (दोघे रा. आय.टी.आय रोड, औंध), गणेश ज्ञानेश्वर साठे (वय-3 रा. हनुमान मंदिरासमोर, पिंपळे निलख), राजु दादा अंकुश (रा. श्रावणी बिल्डींग, फ्लॅट नं. गल्ली नं. 1 पिंपळे गुरव), दिपक गवारे (रा. जंगली महाराज रोड, शिवाजी नगर, पुणे) यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई केली आहे

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.