तरुणाचा खून केल्याप्रकरणी आरपीआयच्या पिंपरी शहराध्यक्ष सुरेश ऊर्फ चिम्या निकाळजे अटकेत

पिंपरी चिंचवड :वेडा म्हटल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून सात जणांच्या टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला दोघांना अटक केली. त्यांनतर पोलिसांनी आरपीआयचा (आठवले गट) माजी अध्यक्ष सुरेश ऊर्फ चिम्या निकाळजे याला मंगळवारी (दि. 10) अटक केली आहे. त्याला बुधवारी (दि. 11) न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

मनोज राजू कसबे (वय 25, रा. मिलिंद नगर, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी काळ्या उर्फ सचिन निकाळजे (वय 40), शौकत समीर शेख (वय 32, दोघे रा. मिलिंदनगर, पिंपरी) या दोघांना अटक केली. त्यानंतर मंगळवारी आरपीआयचा माजी शहराध्यक्ष चिम्या ऊर्फ सुरेश निकाळजे याला अटक करण्यात आली आहे.

अटक केलेल्या आरोपींसह मनोज अर्जुन जगताप, आनंद कदम, संतोष कदम, भूषण डुलगल व त्यांच्या इतर साथीदारांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत मनोज यांच्या आई पुष्पा राजू कसबे (वय 50, रा. पिंपरी) यांनी रविवारी (दि. 8) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी हे मनोज याला वारंवार ‘तू वेडा आहे’ असे चिडवायचा. त्यावर ‘मी वेडा नाही तुम्हीच वेडे आहात’ असे मनोज आरोपींना म्हणाले. त्यानंतर आरोपींनी पुन्हा त्यांना वेडा म्हणून चिडवल्याने मनोज यांनी आरोपींना काठीने मारहाण केली.

या कारणावरून आरोपींनी मनोजला प्लास्टिकची खुर्ची, लाकडी स्टंप, लाकडी बांबू आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले. त्यात मनोजचा मृत्यू झाला. त्यांनतर रविवारी (दि. 8) गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात सुरुवातीला दोघांना अटक केली. त्यांनतर पोलिसांनी आरपीआयचा (आठवले गट) माजी अध्यक्ष सुरेश ऊर्फ चिम्या निकाळजे याला मंगळवारी (दि. 10) अटक केली आहे. त्याला बुधवारी (दि. 11) न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.