‘तू आमच्यामध्ये कशाला येतो’, असे म्हणत पोलिसालाच लगावली कानाखाली, एकाला अटक

पिंपरी चिंचवड : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसाला  ‘तू आमच्यामध्ये कशाला येतो’ असे म्हणत धक्काबुक्की करुन मारहाण  केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी मध्ये घडला आहे. याप्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार अथर्व हॉटेल समोर, जुना जकात नाका, मोशी येथे समोवारी (दि.9) सकाळी साडेआठच्या सुमारास घडला.

सुजित चंद्रकांत जाधव (वय-24 रा. हनुमान नगर, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी पोलीस कर्मचारी संजय बाळासाहेब थेटे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी संजय थेटे हे  भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. सोमवारी (ता.९) सकाळी साडे आठच्या सुमारास ते बिट मार्शल म्हणून कर्तव्यावर असताना मोशी येथील जुना जकात नाक्याजवळ अक्षय सोपान हजारे व आरोपी सुजित जाधव व आरोपीचे वडील चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव (वय ५४) यांच्यात भांडण सुरू होते. त्यावेळी कर्तव्यावर असलेले थेटे हे भांडण सोडवण्यासाठी गेले. त्यावेळी सुजितने मध्यस्थी करणाऱ्या थेटे अंगावरील वर्दीच्या शर्टची कॉलर पकडली.

तसेच सुजितने तू आमच्यामध्ये कशाला येतो, असे म्हणत शेटे यांच्या डाव्या गालावर चापट मारुन धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी सुजितवर गुन्हा दाखल करुन पोलिसांनी सुजित जाधव याला अटक केली आहे. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत साकोरे करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.