विजेची तार अंगावर पडल्याने 20 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू ; खेड तालुक्यातील खराबवाडी येथील घटना
पुणे : खेड तालुक्यातील खराबवाडी येथील वाघजाई नगरच्या हद्दीत विद्युत खांबावरील तार एका 20 वर्षीय तरुणाच्या अंगावर पडून विजेच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विशाल ( वय २०, उत्तर प्रदेश ) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुण दवणे वस्ती येथील हर्षद दवणे यांच्या कँटीनमध्ये कामाला होता. एका कंपनीत चहा देण्यासाठी दुचाकीवरून जात असताना विद्युत खांबावरील तार तुटून त्याच्या अंगावर पडली आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.दरम्यान अशा प्रकारची दुर्घटना घडल्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येतोय.याबाबत म्हाळुगे पोलीस चौकीत फिर्याद देण्याचे काम सुरू आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!