विनापरवाना पिस्टल बाळगल्या प्रकरणी दिवट गावच्या माजी उपसरपंचासह एकाला अटक

पिंपरी चिंचवड : विनापरवाना पिस्टल बाळगल्या प्रकरणी मावळ तालुक्यातील दिवट गावच्या माजी उपसरपंचासह दोघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली.त्याच्याकडून 40 हजार रुपयांच्या पिस्टलसह 600 रुपयांचे तीन जीवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई सोमाटणे गाव बैलजोडी कमानीसमोर, रामचंद्र मंगल कार्यालयाशेजारी, शिरगाव रोड येथे करण्यात आली.

अतुल प्रकाश देशमुख  (वय-26 रा. शिंदेवस्ती, सोमाटणे फाटा, ता. मावळ) आणि मारुती बाळू लोखरे  (वय- 43 रा. मुपो दिवट ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मारुती लोखरे हा दिवट गावचा माजी उपसरपंच आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 ऑगस्ट रोजी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हिंजवडी परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार निशांत काळे व गणेश गिरीगोसावी यांना माहिती मिळाली की, सोमाटणे गावातील बैलजोडी कमानीसमोर एकजण थांबला असून त्याच्याकडे पिस्टल आहे.त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अतुल देशमुख याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी 40 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत देशमुख याच्याकडे पिस्टल बाबत चौकशी केली.

त्यामध्ये जप्त केलेले पिस्टल मारुती लोखरे याने त्याच्याकडे ठेवण्यास दिले असल्याचे देशमुख याने सांगितले. लोखरे याला पोलिसांनी सोमाटणे फाटा येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करत पोलिसांनी याप्रकरणी40 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त दाखल केला. लोखरे हा मावळ तालुक्यातील दिवट गावचा माजी उपसरपंच आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उप-निरीक्षक महेंद्र पाटील, पोलीस अंमलदार निशांत काळे, सुनिल कानगुडे, किरण काटकर, गणेश गिरीगोसावी, शैलेश मगर, सुधीर डोळस यांच्या पथकाने केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.