शिरूरमध्ये वेश्या व्यवसायचा सुळसूळाट, हॉटेल लॉजवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या महिला भरोसा सेलचा छापा

पुणे : शिरुर तालुक्यातील लॉजवर ग्रामीण पोलीस दलातील भरोसा सेलच्या पथकाने छापा टाकून वेश्या व्यवसायाचा भंडाफोड केले आहे. महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेणार्‍या हॉटेलचालक व मॅनेजरला अटक करुन तीन महिलांची सुटका केली आहे.

ओम साई लॉचचा चालक पारस बस्तीमल परमार आणि मॅनेजर शिवकांत सत्यदेव कश्यप (दोघे रा. ओम साई लॉज, सरदवाडी, ता. शिरुर) अशी या दोघांची नावे आहेत.

शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथे ओम साई हॉटेल लॉज येथील मॅनेजर व लॉज चालक हे तीन महिलांकडून देह अपव्यापार करून घेऊन त्यातून पैशांची कमाई करत आहे, अशी खात्रीपूर्वक बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट साहेब यांना मिळाली होती, बातमीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी ताबडतोब सदर बतमीबाबत अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग यांचेशी संपर्क साधला.

आदेशाप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग यांनी लागलीच बातमीची खात्री करून पथक नेमून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी पुणे ग्रामीण स्था.गु.अ. शाखेच्या महिला भरोसा सेल च्या उप निरीक्षक माधवी देशमुख, यांना बोलावून सपोनि सचिन काळे यांचेसह एक पथक तयार करून योग्य त्या सूचना, मार्गदर्शन देऊन कारवाई करण्यास सांगितले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या महिला भरोसा सेल च्या पथकासह पथक कारेगाव येथे कारवाई करिता पोहचल्यानंतर माधवी देशमुख मॅडम यांनी दोन पंच बोलवून घेऊन मिळालेल्या बातमीवर यशस्वी कारवाई करणेकरिता एक योजना आखली आणि एक इसम बनावट ग्राहक म्हणून बोलवून घेतला, आणि त्यास दोन 500 रु च्या नोटा देऊन त्यास ओम साई लॉज येथे बनावट ग्राहक म्हणून जाण्यास सांगितले आणि बातमीची खात्री झाल्यानंतर इशारा करण्यास सांगितले, अशी योजना तयार केली. म पो स ई माधवी देशमुख मॅडम यांचे योजनेला यश आले आणि ओम साई लॉजवर पाठविणेत आलेल्या बनावट ग्राहकाने इशारा केल्यानंतर पोलीस पथकाने लॉजवर छापा टाकून मॅनेजर व चालकाला ताब्यात घेऊन तेथे वेश्या व्यवसाय करणार्‍या तीन महिलांची सुटका केली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधीकारीराहुल धस यांच्या मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सपोनि सचिन काळे, मपोसई माधवी देशमुख, सहा फौज शब्बीर पठाण, सहा फौज तुषार पंधारे, म सहा फौज लता जगताप ,पो. हवा. सचिन घाडगे, पो. हवा. जनार्धन शेळके, पो. हवा. राजु मोमीन, पो. ना. मंगेश थिगळे, पो. ना. अजित भुजबळ, म पो. कॉ. पूनम गुंड, पो हवा मुकेश कदम यांनी केली आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.