आजी रागावल्याच्या रागातून तरूणीची आत्महत्या ; कोल्हापूरातील घटना

कोल्हापूर : आजी रागावल्याचा राग मनात धरून एका 19 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज  याठिकाणी घडली आहे.

पूजा सुरेश भुसुरी (वय,19 रा. भडगाव ता. गडहिंग्लज) असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ही घटना रविवारी (8 ऑगस्ट) रोजी घडली आहे. आत्महत्या नंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत पूजाचं १० वी पर्यंतचं शिक्षण झालं होतं. रविवारी सकाळी ती नेहमीपेक्षा उशीरापर्यंत झोपली होती. खूप उशीरापर्यंत झोपल्याने आजी तिला रागावली होती. आजीने केलेला अपमान मनाला लागल्यानंतर तरुणीने विष  प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. विष प्यायल्यानंतर काही कालावधीने पूजाला अस्वस्थ वाटू लागलं. यामुळे नातेवाईकांनी तिला त्याच दिवशी कोल्हापूरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलॆ. दुसऱ्या दिवशी सोमवारी (9 ऑगस्ट) रोजी तिला गडहिंग्लज येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. याठिकाणी उपचार सुरू असताना, मंगळवारी 10 ऑगस्ट रोजी पूजानं अखेरचा श्वास घेतला आहे.

केवळ उशीरापर्यंत झोपल्यामुळे रागावल्याच्या कारणातून तरुणीनं जीव दिल्यानं गावात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. डॉ. पाटोळे यांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नसून या घटनेचा तपास सुरू केला आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.