हिमाचलमध्ये भीषण दुर्घटना ! प्रवाशांनी भरलेल्या बसवर बसवर कोसळला डोंगरकडा; ४० जण ढिगाऱ्याखाली अडकले

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमधील किन्नूरमध्ये एका प्रवासी बसवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशांनी भरलेल्या बसवर ही दरड कोसळली आहे. तसेच या दरडीमध्ये इतर अन्य वाहनेही अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेमध्ये किमान ४० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरडीच्या ढिगाऱ्याखाली इतर अन्य वाहनेही अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेमध्ये किमान ४० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता पोलीस उपायुक्त होसेन सिद्दकी यांनी व्यक्त केली आहे. चौरा आणि किन्नूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर हा अफघात झाला आहे. या दुर्घटनेमध्ये एक डोंगर कडाच तुटून बसवर पडल्याने संपूर्ण बस या ढीगाऱ्याखाली सापडली आहे. ही बस किन्नूरमधून हरिद्वारकडे जात असल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रीय महामार्ग पाचवर झालेली ही दुर्घटना छील जंगलाच्या परिसरात घडली आहे. या दुर्घटनेमुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. या ठिकाणी बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. बसच्या चालकाला सुखरुप बाहेर काढण्यात आले असले तरी या ढिगाऱ्याखाली अनेक प्रवाशी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या दरडीखाली बस बरोबर काही खासगी वाहनेही गाडली गेल्याची शक्यता आहे. खासगी वाहनांमधील काही लोक मदतीसाठी ओरडत होते असे  स्थानिकांनी म्हटले आहे.

हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनीही यासंदर्भातील माहिती दिली आहे. “मी पोलीस आणि स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना बचाव कार्यासंदर्भातील निर्देश दिले आहेत. एनडीआरएफच्या तुकड्यांनाही माहिती देण्यात आली आहे.

हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनीही यासंदर्भातील माहिती दिली आहे. “मी पोलीस आणि स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना बचाव कार्यासंदर्भातील निर्देश दिले आहेत. एनडीआरएफच्या तुकड्यांनाही माहिती देण्यात आली आहे. आम्हाला मिळेलेल्या माहितीनुसार एख बस आणि एक गाडी या खाली अडकली आहे. आम्ही सविस्तर माहितीची वाट पाहत आहोत,” असे ठाकूर म्हणाले आहेत.

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.