Ration Cardमध्ये नवीन सदस्याचे नाव कसे समाविस्ट करायचे? वाचा काय आहे प्रक्रिया.

मुंबई : देशातील अनेक नागरिकांसाठी रेशन कार्ड  एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. दारिद्र्य रेषेखाली ज्यांचे नाव येते अशा वर्गासाठी रेशन कार्ड अत्यंत महत्त्वाचे आहे. केंद्र सरकार लॉकडाऊनच्या  काळात या कार्डवर सामान्य नागरिकांना अन्नधान्याचे वाटप करत आहे, अशावेळी तुमच्याकडे रेशनकार्ड असणे गरजेचे आहे. कोणतीही गरीब व्यक्ती उपाशी राहू नये, असा सरकारचा मानस आहे. त्याचप्रमाणे अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड आवश्यक आहे. अशावेळी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, तुमचे हे महत्त्वाचे कागदपत्र अपडेटेड असणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारने ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ ची घोषणा केली होती. याअंतर्गत रेशन कार्ड होल्डर कोणत्याही राज्यात असल्यास त्याला तिथे त्या रेशन कार्डावर अन्नधान्य मिळवता येईल.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

तसेच तुम्ही बहुतेक सरकारी कामांसाठी किंवा शाळा कॉलेजसमध्ये प्रवेश घेण्यासाठी रेशन कार्डाची गरज भासते. रेशन कार्ड हे तुमची ओळख आणि पत्ताचा पुरावा म्हणून वापरले जाते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची नावं या रेशन कार्डमध्ये समाविष्ट केली जातात.

परंतु कालांतराने जेव्हा कुटुंब मोठ होत जातं तेव्हा या नवीन सदस्यांचे नाव रेशन कार्डमध्ये समाविष्ट करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, लग्नानंतर, कुटुंबात नवीन सदस्य येतो किंवा घरात मूल जन्माला आलं किंवा मुलं दत्तक घेतले, तर त्याचे नावही रेशन कार्डमध्ये नोंदवावे लागते.

परंतु सरकारी काम म्हटल्यावर त्याला वेळ हा लागणारचं तसेच त्यासाठी काय काय करावे लागते हे काही लोकांना माहित नसते, त्यामुळे बरेच लोकं रेशन कार्डवर नवीन व्यक्तीचं नाव नोंदवण्याच्या प्रक्रियेला टाळतात किंवा पुढे ढकलतात. त्यामुळे अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, तुम्ही रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव सोप्या आणि जलद पद्धतीने कसे जोडू शकता.

लग्नानंतर जेव्हा नवीन सून घरी येते, तेव्हा रेशन कार्ड सोबत त्या मुलीला तिचा आधार कार्डही अपडेट करावा लागेल. मुलीला तिच्या वडिलांच्या नावाऐवजी तिच्या पतीचे नाव आणि तिचा पत्ता बदलावा लागेल. आधार अपडेट झाल्यानंतर तुम्हाला ते घेऊन तुमच्या रेशन कार्डवर नाव टाकण्यासाठी घेऊन जावे लागेल.

नवीन सुनेचे नाव रेशन कार्डमध्ये समाविष्ट करण्यासाठी अन्न विभागाच्या अधिकाऱ्याकडे अर्ज पाठवावा लागेल त्याला तुमच्या नवीन आधार कार्डाची प्रत जोडावी लागेल.

जर तुमच्या घरात नवीन मूल जन्माला आलं असेल किंवा तुम्ही मूल दत्तक घेतले असेल, तर रेशन कार्डमध्ये त्याचे नाव नोंदवण्यासाठी आधी त्याचे आधार कार्ड बनवावे लागेल. आधार कार्ड बनविल्याशिवाय तुम्ही त्याचे नाव रेशन कार्डमध्ये समाविष्ट करू शकणार नाही.

त्याचवेळी, आधार कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला मुलाच्या जन्माच्या प्रमाणपत्राची (Birth Certificate) आवश्यकता असेल. आपण सर्व आवश्यक कागदपत्रे गोळा केल्यानंतर, रेशन कार्डमध्ये आपल्या लहान बाळाचे नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकता.

नवीन सदस्याचे नाव ऑनलाइन कसे नोंदवायचे
तुम्हाला रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव ऑनलाइन देखील समाविष्ट करू शकता. हे करण्यासाठी, आपल्याला आपल्या राज्याच्या अन्न पुरवठ्याच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. येथे तुम्हाला नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करण्याव्यतिरिक्त इतर अनेक पर्याय दिसतील.

परंतु त्याआधी तुम्हाला हे पाहावं लागेल की, तुमचं राज्य ऑनलाइन सेवा प्रदान करते की नाही. तुम्ही दिल्ली, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये या सुविधेचा ऑनलाइन लाभ घेऊ शकता.

रेशन कार्ड ऑनलाइन अपडेट कसे कराल?

-सर्वप्रथम तुम्हाला संबधित राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. त्याठिकाणी आयडी बनवून लॉग इन करा. काही मिनिटांमध्ये हे काम पूर्ण होईल.

-लॉगइन केल्यानंतर या वेबसाइटच्या होमपेजवर नवीन सदस्याचे  नाव जोडण्याचा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर एक फॉर्म ओपन होईल.

-हा फॉर्म तुम्हाला संबधित  नवीन सदस्याची पूर्ण माहिती देऊन भरावा लागेल.

-पुढील स्टेपमध्ये तुम्हाला फॉर्ममध्ये आवश्यक त्या कागदपत्रांची फोटोकॉपी अपलोड करावी लागेल. त्यानंतर फॉर्म सबमिट करा.

-फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल. ज्या नंबरचा वापर करून तुम्ही याच वेबसाइटवर तुमचा फॉर्म ट्रॅक करू शकता

-हा फॉर्म आणि त्याबरोबर जोडण्यात आलेले दस्तावेज अधिकाऱ्यांकडून तपासण्यात येतील आणि त्यानंतर ही माहिती योग्य असल्यास तुमची रिक्वेस्ट स्विकारली जाईल. पोस्टाच्या माध्यमातून तुमच्या पत्त्यावर रेशन कार्ड पाठवण्यात येईल.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.