अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात चोरीचा आरोप, कायदेशीर कारवाईची शक्यता

मुंबई : अभिनेता श्रेयस तळपदे आणि सुरेश सावंत यांनी सुप्रसिद्ध नाटक अलबत्या गलबत्याचा सेट चोरल्याचा आरोप निर्माता राहुल भंडारे यांनी केला आहे. गेली १५-१६ वर्षे नाट्य सृष्टीला सुपरहिट नाटकं देणारे अव्दैत थिएटरचे निर्माते राहुल मधुकर भंडारे यांच्या “अलबत्या गलबत्या” या नाटकाने अनेक विश्वविक्रम केले. नाटकासोबतच नाटकाचे आकर्षण ठरलेला नाटकाचा सेट देखील नाट्य क्षेत्रासहित प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे.अद्वैत थिएटर या नाट्यनिर्मिती संस्थेचे निर्माते राहुल भंडारे यांनी त्यांच्या ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाचा सेट (नेपथ्य) चोरीला गेला असल्याची तक्रार शिवडी पोलिस ठाण्यात दिली आहे.

कोरोनाच्या प्रभावामुळे लॉकडाऊन काळात सर्व थेटर सहित नाट्यसृष्टी बंद आहे. त्यामुळे माझ्या अलबत्या गलबत्या या नाटकाचा सेट प्रवीण भोसले यांच्या गोडाउन मध्ये कोळसा बंदर, काळा चौकी येथे ठेवण्यात आला होता. मात्र तो सेट कोणतीही पूर्वकल्पना न देता सुरेश सावंत यांनी गोडाऊन मालकास खोटे सांगून गोडाऊन मधून चोरून श्रेयस तळपदे यांच्या OTT प्लॅटफॉर्म च्या भक्षक या एकांकिकेच्या शूटसाठी वापण्यात आला.

मुळात या नाटकाचा सेट वापरण्यासाठी अव्दैत थिएटर या नाट्यसंस्थेचे निर्माते राहुल भंडारे यांची परवानगी घेणे गरजेचे होते. तसेच राहुल भंडारे यांना सुरेश सांवत यांनी चुकीची माहिती देत हा सेट गोडाऊन मधून काढून श्रेयस तळपदेला देण्यात आला.

मात्र राहुल भंडारे यांना याविषयी कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना सुरेश सांवतने दिली नाही. त्यामुळे आता हे प्रकरण श्रेयस तळपदेच्या चांगलेच अंगाशी येण्याची शक्यता आहे. बेकायदेशीरित्या या नाटकाचा सेट कमर्शिअल कारणासाठी वापरण्यात आल्याने Intellectual Property Rights अंतर्गत श्रेयस तळपदे आणि सुरेश सावंत यांच्यावर कायदेशीर कारवाईसाठी राहुल भंडारे यांच्याकडून याबाबतचे अर्ज शिवडी पोलिस स्थानकात देण्यात आला आहे. त्यामुळे श्रेयस तळपदे आणि सुरेश सावंत यांच्यावर कायदेशीर कारवाईही केली जाणार असल्याची शक्यता आहे.

निर्माते राहुल भंडारे यांचा तक्रार अर्ज शिवडी पोलिस स्थानकत स्वीकारला असून पोलिसांन मार्फत अभिनेते श्रेयस तळपदे सोबतच सुरेश सावंत यांची चौकशी होणार आहे. सोबतच शासनाचे लॉक डाऊनचे नियम मोडल्या बाबत त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्यात यावी अशी विनंती करतो

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.