तडीपार गुन्हेगार ‘मट्या’ ला समर्थ पोलिसांकडून अटक

पुणे : पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या आरोपीला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई निशांत टॉकीज समोर, भवानी पेठ, पुणे येथे केली आहे.

सुशांत उर्फ मटया शशीकांत कुचेकर (वय २७, सध्या रा. अहमदनगर मुळ रा. ८४३ राजेवाडी, नानापेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेला गुन्हेगार मट्या उर्फ सुशांत कुचेकर हा हद्दीतील निशांत टॉकीजसमोर थांबला असल्याची गुप्त माहिती तपास पथकातील सुमित खुट्टे यांना मिळाली. याबाबत तपास पथकाचे पोउपनि संदिप जोरे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शानाखाली कारवाई करत गुन्हेगार मट्या यास ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्याला सदर ठिकाणी येण्याचे कारण विचारले असता तो उडवाउ डविची उत्तरे देवू लागला तसेच त्यास तडीपार काळात सदर ठिकाणी येण्याचे कारण विचारले असता त्याने कोणाची परवानगी घेतली नसलेबाबत सांगीतले. तडिपार आदेशाचा भंग केल्याने आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर डॉ.संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त श्रीमती प्रियंका नारनवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग सतिश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) उल्हास कदम, यांचे मार्गदर्शनानुसार सहा. पोलीस निरीक्षक संदीप जोरे, पोलीस अंमलदार सुमित खुट्टे, विठ्ठल चोरमले, संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, सुभाष मोरे, निलेश साबळे, सुनिल हासबे, महेश जाधव, नितीन घोसाळकर, श्याम सुर्यवंशी, मपोना वनिता गोरे यांनी केली आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.