वाहनाची तोडफोड करणा-या आरोपीवर दरोडाचा गुन्हा दाखल ; तिघांना अटक

पिंपरी चिंचवड : वाहनाची तोडफोड करणा-या आरोपीवर दरोडाचा गुन्हा दाखल तिघांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. चौकोबा बबनराव शिंदे, यश हरी घोंगडे, संदीप प्रेमचंद गोलेछा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी हातात कोयता व लाकडी दांडके घेवून ट्रॉन्सपोर्टनगर येथील चिमा सोही ढाबाचे पाठीमागील जाळी काढून आत येवून आम्हाला जेवन दे असे म्हणाले असता ढाबा चालकाने आता जेवन बंद झाले आहे असे सागितले असता त्यापैकी आकाश उर्फ छोट्या खडका यांने त्यांचे हातातील कोयता ढाबा चालक बलजेदसिंग सोही यांचे गळयाला लावून तुषार शेंडगे यांने खिशातील २५०० रुपये बळजबरीने काढून घेवून मारहाण केली व जर तु पोलीसांना सांगितले तर तुला परत येवून मारणार असे म्हणून निघून जात असताना रोडला लावलेल्या ८ ते १० मालट्रक व टेम्पोच्या काचा कोयताने व लाकडी दांडक्याने फोडून नुकसान केले म्हणून फिर्यादी बलजेदसिंग जागरसिंग सोही यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता

सदर दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. व निष्पण गुन्हेगाराचा शोध घेवून त्यांना तात्काळ अटक करणे करीता अधिकारी व अंमलदार यांच्या २ स्वतंत्र टिम तयार करुन तपास सुरू केला.पोलिसांनी सदर आरोपीचा शोध घेत तीन आरोपींना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची १५ ऑगस्ट पर्यत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आला आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.