सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, चार जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड :  सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने अंगदुखी आणि तापीसाठी वापरल्या जाणा-या (डोलो 650 एमजी) 20 गोळ्या खाऊन आत्महत्या केली. ही घटना 8 ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी विवाहितेच्या वडीलांनी सासरच्या चार जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

धनंजय नंदू जाधव (वय 29), नंदू मार्तंड जाधव, महिला आरोपी, एकनाथ भालेराव (सर्व रा. जय भवानी नगर, पाषाण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मयत विवाहितेचे वडील बाळासाहेब रामभाऊ यादव (वय 51, रा. चिखली) यांनी  फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी यांची मुलगी तिच्या सासरी नांदत असताना आरोपींनी तिला संगनमत करून त्रास दिला. लग्नकार्यात आणि लग्नापूर्वी सासरच्या लोकांना व्यवस्थित मानपान केला नाही. लग्नामध्ये पाच ते दहा लाख रुपये हुंडा दिला नाही, या कारणावरून आरोपी मयत विवाहितेकडे माहेरहून हुंडा आणण्याची मागणी करीत होते.

सासरचा त्रास असहाय्य झाल्याने फिर्यादी यांच्या मुलीने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने डोलो 650 एमजी या 20 गोळ्या खाल्ल्या. हा प्रकार आरोपी पती धनंजय याला माहिती असूनही विवाहितेवर पिंपरी येथील एका रुग्णालयात उपचार सुरु असतानाही त्याने डॉक्टरांना ही बाब सांगितली नाही. त्यामुळे विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सासरच्या लोकांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.