कोंढव्यात 22 वर्षीय तरुणावर कोयत्याने वार करून खून

पुणे : पुण्याच्या येवलेवाडी भागात एका 22 वर्षीय तरुणाचा धारदार हत्याराने सपासप वार करून खून करण्यात आला.खून झालेल्या तरुणाने अल्पवयीन असताना एकाचा खून केला होता. त्यामुळे पूर्ववैमनस्यातून हा प्रकार झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कार्तिक जाधव (वय 22) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  कोडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील येवलेवाडी भागात कामठे पाटील नगर येथे रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन संबंधित रुग्णाला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान मयत कार्तिक जाधव याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. अल्पवयीन असताना त्यांनी हा खून केला होता. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपी वर गुन्हा दाखल केला असून पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.