दुर्दैवी ! चार वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आईची आत्महत्या ; शिरुर तालुक्यातील खळबळजनक घटना
शिरुर : चार वर्षाच्या मुलासह आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शिरुर तालुक्यातील करंदी येथे घडली आहे. या घटनेनंतर महिलेच्या पतीनेही आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मोनिका भगवान चंद्रावळे (वय-30) व साई उर्फ ऋषी भगवान चंद्रावळे (वय-4) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,मोनिका चंद्रावळे या काही दिवसांपासून तणावात होत्या. मोनिका या सकाळी चार वर्षाच्या साईला घेऊन कोठेतरी गेल्या. दुपारी शेजारी काही नागरिक शेतात काम करत असताना विहिरीमध्ये त्या दोघांच्या चपला पाण्यावर तरंगताना आढळून आल्या. त्यमुळे या माय-लेकांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, काही नागरिकांनी लोखंडी गळ व दोरीच्या सहाय्याने मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विहिरीमध्ये मोनिका आणि साई यांचा मृतदेह मिळून आला. पत्नी आणि मुलाच्या आत्महत्येनंतर पती भगवान यांनी आत्महत्याचा प्रयत्न केला.
भगवान यांच्यावर पुणे येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरु असून त्यांची परिस्थिती स्थिर आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करीत आहेत
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!