पुणे शहरातील गुड्ड्या कसबे टोळीवर मोक्का कारवाई

पुणे : येरवडा परिसरामध्ये जबरी चोरी, नागरीकांवर खुनी हल्ला, वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. याबाबत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आदेश दिला. त्यानुसार आत्तापर्यंत “मोक्का’अंतर्गत 47 कारवाया करण्यात आल्या.

प्रफुल्ल ऊर्फ गुड्ड्या कसबे, शिवराज मनोज मिरगळ, आशुतोष आडागळे, तेजस हरिदास दनाने, विवेक ऊर्फ शिवम दुर्गेश सिंग, कुणाल ऊर्फ सोनबा संजय चांदणे, संदिप सुग्रीव घोडेस्वार, रोहित ऊर्फ विनायक प्रमोद भेंडे, दिपक दत्तु मदने, करण भारत सोनवणे, महेश सुनील कांबळे, अजय युवराज कसबे, अनिकेत अनंद कसबे, महेश सरवदे अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.

गुड्ड्या कसबे हा टोळीप्रमुख आहे. त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने एक ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊ येरवड्यातील लक्ष्मीनगर येथे तिघांवर जीवघेणा हल्ला केला. त्याचवेळी एका आरोपीने तेथील रहिवाशास दगड मारून त्याच्याकडील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. तसेच तलवार, कोयते, पालघन अशी हत्यारे घेऊन नागरीकांच्या घरांवर दगडफेक केली.तसेच नागरीकांच्या घरातील सामानही फेकून दिले. याबरोबरच रस्त्याच्याकडेला लावलेल्या वाहनांची तोडफोड करीत दहशत निर्माण केली.याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.

आरोपी कसबे याने गुन्हेगारांची टोळी तयार करुन टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी गुन्हे केले आहेत. आरोपींवर टोळीचे वर्चस्व निर्माण करुन खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घातक शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचा प्रस्ताव येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख
यांनी परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण यांना पाठवला होता. त्याला मंजुरी देण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग किशोर जाधव (

आतापर्यंत 47 टोळ्यांवर मोक्का
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 47 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.