बॅनर लावण्याच्या कारणावरून तरूणाचा बॅट डोक्यात घालून खून

उमरी (जि.नांदेड) :उमरी तालुक्यातील निमटेक येथील नेत्याचे बॅनर लावण्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

महेश सुरेशराव पाटील (वय २९ l रा . निमटेक ता. उमरी) असे मयत तरुणाचे नाव आहे.  याप्रकरणी उमरी पोलिस ठाण्यात सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मयत महेश हा आपल्या शेताकडून घराकडे मोटरसायकलवरून येत होता. त्यावेळी आरोपी खुशाल मोहनराव पाटील, आदित्य खुशाल पाटील, सुनिता खुशाल पाटील, त्र्यंबक माधवराव पाटील, शैलेश त्र्यंबक पाटील, मारुती ऊफ मनोज अशोक पाटील आदीने महेश पाटील यांना घरी बोलावून सर्वांनी मारहाण केली. यावेळी एका आरोपीने महेशच्या डोक्यात बॅटने मारुन गंभीर जखमी केले. तर इतर जणांनी बेदम मारहाण केले.

या मारहाणीत महेश हा गंभीर जखमी झाल्याने उमरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी  उपचारा सुरू केले असता महेश कोमात गेला होता. त्याला नांदेडला घेऊन जा असे नातेवाईकांना सल्ला देण्यात आला. नांदेडवरुन परत नातेवाईकांच्या आग्रहा खातर तेलंगणा राज्यातील निझामाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता गुरुवारी (ता.१२) पहाटेच्या सुमारास महेश पाटील याचे निधन झाले. या प्रकरणी मृत महेश पाटील यांची आई कलावतीबाई सुरेशराव पाटील यांच्या फिर्यादीवरून उमरी पोलिस ठाण्यात सहा आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांनी दिले.

या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी निमटेक येथे भेट देऊन माहिती घेतली. पुढील तपास पोलिस निरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रघुनाथराव शेवाळे तपास करित आहेत. यातील दोन आरोपींना अटक करण्यात आले असुन यात आरोपी खुशाल मोहनराव पाटील व त्र्यंबक पाटील यांना अटक करण्यात आले असल्याचे माहिती पोलिसांनी दिले. महेश पाटील यांचा मुत्यू झाल्याने निमटेक येथे वातावरण ताणताणावा खाली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.