सराईत दुचाकीचोराला बारा तासात अटक ; समर्थ पोलिसांची कामगिरी

पुणे : पुणे शहरात दुचाकी चोरीसह विविध गुन्हे असलेल्या सराईताला समर्थ पोलिसांनी अवघ्या बारा तासांमध्ये अटक केली. त्याच्याकडून वाहनचोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

मयुर मोतीराम राठोड (वय २३, रा. स.नं. १०, गणेशनगर, सिध्देश्वर मंदीराजवळ, येरवडा पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट रोजी हिरो होंडा कंपनीची पॅशन मोटार सायकल चोरी झाल्याचा गुन्हा समर्थ पोलीस ठाण्यात दाखल होता. या गुन्ह्याचा तपास समर्थ पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे आदेशाने तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी वाहन चोरीला प्रतिबंध होणेकामी व वाहन चोर पकडणेकामी वाहन चेकींग करीत असतांना एक व्यक्ती मित्तल कोर्ट जवळ सार्वजनिक रोडवर होंडा पॅशन दुचाकीवर आला असता त्याचे गाडीला चावी नव्हती. पोलिसांनी त्याच्याकडे  गाडीच्या कागदपत्राबाबत विचारणा केली असता तो असमाधान कारक व उडवाउडवीची उत्तरे देवु लागला म्हणुन त्यास पोलीसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मंगळवार पेठेतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याशिवाय 10 दिवसांपुर्वी त्याने येरवडा परिसरातून दुचाकी चोरल्याचे उघडकी आले. सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असून
त्याचेवर शरीराविरुध्दचे वाहन चोरीचे एकुण ५ गुन्हे दाखल आहेत

ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, एपीआय संदीप जोरे, संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, सुमीत खुट्टे, सुनील हसबे, विठ्ठल चोरमले, नीलेश साबळे, महेश जाधव, सुभाष मोरे, हेमंत पेरणे, शुभम देसाई, नितीन घोसाळकर, जितेंद्र पवार, श्याम सुर्यवंशी यांनी केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.