दुस-यास विकलेल्या घराची परत विक्री, दोन सख्ख्या भावांच्या विरोधात गुन्हा दाखल

पुणे : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गणराज पार्क येथील दोघांनी संगनमत करुन मालमत्ता दुस-यास साठेखत करुन विकलेली असताना तसेच सदर मालमत्तेवर एका होम फायनान्स यांचा घरतारण कर्जबोजा असूनही माहिती न देता बावीस लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन सख्ख्या भावांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवनाथ प्रकाश काशीद (वय- ३४,) व सोमनाथ प्रकाश काशीद (रा. दोघेही गणराज पार्क, काळभोर नगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.याप्रकरणी सरोज प्रकाश जाधव (वय-४३, रा. हिंगणे मळा, हडपसर, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरोज जाधव या पती प्रताप बाळकृष्ण जाधव व दोन मुलांसह हडपसर या ठिकाणी भाडयाने राहण्यास असुन जेवणाची मेस चालवुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ०४/०३/२०२० रोजी ओळख असलेल्या विलास शितोळे यांच्या मार्फत गणराज पार्क काळभोर नगर या ठिकाणी राहत असलेले नवनाथ व सोमनाथmकाशीद यांच्या मालकी हक्क व ताबेवहिवाटीत असणारी एक गुंठा जागा व त्यावरील आरसीसी बांधकाम स्लबसह सुमारे छत्तीस लाख रुपयांना.विकत घेण्याचा व्यवहार ठरवला होता. यावेळी.काशीद कुटुंबियातील सर्वजण उपस्थित होते..त्यावेळी नवनाथ काशीद यांना रोख अडीच लाख
रुपये विसारापोटी त्या वेळेस दिले होते.

त्यानंतर वेळोवेळी पैसे देऊन एकूण १६ लाख रुपये पोच केले होते. उर्वरित रकमेचे पुढील तारखेचे चेक देऊन १३ मार्च २०२० खरेदीखत करण्यात आले होते. सरोज जाधव यांचे कर्ज मंजूर झाल्यानंतर चेक बँकेत भरण्याचे ठरले होते; मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर कर्ज मंजूर होण्यास उशीर झाला.दरम्यान सरोज जाधव यांनी मालमत्तेचा सर्च रिपोर्ट काढून पाहिला असता घर दुसऱ्याला १० लाख रुपयांना साठेखत करुन विकल्याचे समजले.तसेच या घरावर एका होम फायनान्स कडूनही १२ लाख रुपये कर्ज काढल्याची माहिती मिळाली.सरोज जाधव यांनी दिलेले पुढील तारखेचे चेकही बँकेत भरण्यात आले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सरोज जाधव यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात संपर्क साधला. अगोदर दिलेले १६ लाख, खरेदी खताचा खर्च ३ लाख ८० हजार, सोमनाथ काशिद याला उसने दिलेले २ लाख २० हजार अशी एकूण २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा त्यानी दाखल केला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.