विवाहितेस घटस्फोट घेण्यास जबरदस्ती; त्रासाला कंटाळून विवाहितेची ईमारतीहुन उडी घेत आत्महत्या

पिंपरी चिंचवड :  घराच्या हक्कसोड पत्रावर सही करण्यास तसेच घटस्फोट घेण्यास जबरदस्ती केली, या त्रासाला कंटाळून विवाहितेने ईमारतीहुन उडी घेत आत्महत्या केली. ही घटना ७ जुलै पुनावळेत घडला.याप्रकरणी बुधवार १४ जुलै रोजी पतीसह सासरच्या चार जणांच्या विरोधात पुण्यातील वाकड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

किरण संदीप पाटील (वय 36) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या आईने मंगळवारी (दि. 13) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती संदीप कांतीलाल पाटील (वय 40), सासरे कांतीलाल झावरू पाटील (वय 56) आणि दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या विवाहित मुलगी किरण पाटील हिचा लग्नानंतर पुण्यातील पुनावळे येथे सासरी राहत असतांना २०११ ते सात जुलै २०२१ या कालावधीत वर्णावरून वारंवार हिणवणे. तसेच भागीदारीमध्ये घेतलेल्या घराच्या हक्क सोडपत्रावर सही करण्यास आणि जबरदस्तीने घटस्फोट देण्यासाठी मानसिक त्रास देत पतीसह सासरकडच्या मंडळींनी छळ केला. या त्रासाला कंटाळून विवाहिता किरण हिने ७ जुलै रोजी राहत असलेल्या इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.