सातारा –सांगलीतून येऊन चाकण परिसरात लुटमार, घरफोडी करणाऱ्या चौघांना अटक ; गुन्हे शाखा युनिट चारची कामगिरी

पिंपरी चिंचवड :सातारा-सांगली येऊन चाकण परिसरात लुटमार व घरफोडी करणा-या ४ आरोपींना गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलीसांनी अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.13) वाकड, काळाखडक याठिकाणी करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अनिकेत ऊर्फ माम्या आबासो टेळे (वय 22, रा. कोळेवाडी, ता. कराड, जि. सातारा), सौरभ पांडूरंग राशीवडेकर (वय 21, रा. तडवळे-कदमवाडी, ता. शिराळा, जि. सांगली), अंकित महादेव थोरात (वय 21, रा. तारुख, ता. कराड, जि. सातारा) व पवन सुरेश कदम (वय 19, रा. तडवळे-कदमवाडी, ता.शिराळा, जि. सांगली) असे ताब्यात घेतलेल्या चार आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,भोपाळ येथुन कामाचे शोधात चाकण परिसरात आलेल्या एका २६ वर्षीय युवकास ११ जुलै  रोजी  मौजे. निघोजे ता. खेड पुणे येथे महिंद्रा कंपनीचे मागिल बाजुस असलेल्या एका शेतात दोन अनोळखी व्यक्तींनी चाकुचा धाक दाखवुन लाथ-बुक्यांनी मारहाण करुन त्याचेकडिल मोबाईल फोन, रोख रक्कम व ए.टी.एम. कार्ड कावुन घेतले व त्याचा पिन कोड घेवुन ६ हजार रूपये रोख रक्कम काढुन घेतली होती. सदर युवकाने दिलेल्या तक्रारीवरून म्हालुंगे पोलिस चौकीत (चाकण पोलिस स्टेशन) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सदर गुन्ह्याबाबत गुन्हे शाखेने स्वतः लक्ष घालुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-४ चे पोलिस या गुन्हयाचा समांतर तपास सुरु केला होता. तपासादरम्यान केलेल्या तांत्रिक विश्लेषणात व गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, एक टोळी सातारा-सांगली येथून येऊन चाकण परिसरात लुटमार, घरफोडी करत असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, हे आरोपी शुक्रवारी (दि. 13) वाकड, काळाखडक याठिकाणी चोरीचा माल विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून दहा मोबाईल, दोन मोटार सायकल आणि एक एटीएम कार्ड असा एकूण 2 लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त मुख्यालय/गुन्हे सुधीर हिरेमठ , सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे डॉ. प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा, युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक, सिद्धनाथ बाबर, सहा.पो.उप.नि. धर्मराज आवटे, दादा पवार, नारायण जाधव, पोहवा/ प्रविण दळे, संजय गवारे, अदिनाथ मिसाळ, राहिदास आडे, तुषार शेटे, संतोष असवले, पोना/ लक्ष्मण आढारी, मो. गौस नदाफ, वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, सुरेश जायभाये, पोशि/ प्रशांत सैद, तुषार काळे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, गोंविद चव्हाण, आदिनाथ ओंबासे यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.