हृदयदायक ! माकड अंगावर बसल्याची भीती; १० वर्षाच्या चिमुकल्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

नांदेड : नांदेडमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. एका चिमुकल्याच्या अंगावर माकड येऊन बसले. त्या मुलाने याची धास्ती घेतल्याने त्याचा बळी गेला असल्याची घटना मुदखेड तालुक्यातील बारड गावात घडली आहे. माकड अंगावर येऊन बसल्याची चिमुरड्याने एवढी धास्ती घेतली की त्याला त्याच भीतीने हृदयविकाराने झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. वीर नागेश संगेवार (वय १० , बारड गाव) असे मृत्यू झालेल्या  चिमुकल्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  १० वर्षाय वीर संगेवार हा घरासमोर खेळत होता. त्याचवेळी एक माकड त्याच्या अंगावर येऊन बसले. त्यानंतर या मुलाने भयंकर धास्ती घेतली. त्यातच त्याला ताप आल्याने त्याला नांदेडच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले.यादरम्यान त्याच्या विविध आजाराच्या तपासण्या करण्यात आल्या. मात्र त्या सर्व नॉर्मल आल्या. मात्र माकडांबद्दलची त्याच्या मनातील दहशत कमी झाली नव्हती. त्यातच 13 ऑगस्ट रोजी त्याचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला.

बारड शिवारात माकडांनी हैदोस घातला असून याबाबत वन विभागाकडे तक्रारी करूनही माकडाचा बंदोबस्त झालेला नाही. त्यामुळे वीरच्या या मृत्यूला बारडच्या गावकऱ्यांनी वन विभाग जबाबदार असल्याचा आरोप केलाय. त्यातच पूर्वी बंदूक धारी पहारेकरी गावात माकडांना हुसकावण्यासाठी कार्यरत होता. आता तो ही नसल्याने मर्कट लीला वाढल्या आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.