अनैतिक संबंधातून प्रियकराचा ओढणीने गळा आवळून खून ; महिलेस अटक

पिंपरी-चिंचवड : लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून विवाहित प्रियकराचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.याप्रकरणी एका महिलेला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना चिंचवड स्टेशन  येथील व्हाईट हाऊस लॉजिंग व बोर्डिंग येथील रुम नं. 307 मध्ये शुक्रवारी (दि.13) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

पैगंबर गुलाब मुजावर (वय-35 रा. एमआयडीसी, भोसरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मयत पैगंबर मुजावर याच्या पत्नीने पिंपरी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.14) सायंकाळी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिंपरी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणी आणि मयत पैगंबर गुलाब मुजावर यांच्यात गेल्या एक दिड वर्षांपासून अनैतिक प्रेम संबंध होते. या तरुणीने पैगंबर याला लग्नासाठी तगादा लावला होता.मात्र, मयत पैगंबर गुलाब मुजावर हा विवाहित असल्याने तो आपल्या प्रेयसीला लग्न करण्यासाठी सतत टाळा-टाळ करत होता. त्यामुळे पैगंबर गुलाब मुजावर याला चिंचवड स्टेशन समोरील व्हाईट हाऊस लॉजिंग अँड बोर्डिंग मध्ये बोलावून आपल्याच प्रियकराचा कट रचुन खून या तरुणीने केला. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.