पिंपरी चिंचवडमधील सर्व दुकाने, शॉपिंग मॉल, उपहारगृहे, बार आजपासून रात्री दहा वाजेपर्यंत खुली राहणार

पिंपरी चिंचवड :  पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व व्यापारी दुकाने, सर्व शॉपिंग मॉल्स, उपहारगृहे, बार आजपासून सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. लोकल ट्रेन सुविधा सुरु केली आहे. शहरात काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेवून १४ दिवस पूर्ण झालेले आवश्यक राहील. तर, सिनेमागृह / नाट्यगृह, मल्टिप्लेक्स, धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद राहणार आहेत. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी निर्गमित केले आहेत.

आरोग्य सेवा देणारे अधिकारी / कर्मचारी / अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा व दुसरी मात्रा (डोस) घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांनाच लोकलट्रेन प्रवास अनुज्ञेय करण्यात येत आहे. ज्या कर्मचारी अथवा नागरिक यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झाले आहे. त्यांना लसीकरणाच्या अंतिम प्रमाणपत्राच्या आधारे व आस्थापनांच्या ओळखपत्रासह स्वतंत्रपणे राज्यशासनाने ठरवून दिलेल्या यंत्रणेमार्फत विहीत कार्यपध्दतीने (ऑनलाईन ऑफलाईन) प्रमाणित केलेल्या ओळखपत्र धारकानांच लोकलट्रेन प्रवासासाठी मासिक/ त्रैमासिक पास देण्यात यावेत. रेल्वे तिकिट तपासनीस यांना लसीकरण पूर्ण झाल्याचे नमूद केलेले ओळखपत्र तपासण्याचा अधिकार असेल. ज्या प्रवाशांकडे असे ओळखपत्र नसेल किंवा प्रवाशांकडून ओळखपत्र खोटे आढळल्यास त्यांच्याकडून तसेच ज्यांनी खोटे प्रमाणपत्र प्रमाणीत केले असेल त्यांच्याकडून 500 रुपये दंड वसूल केला जाईल.

उपहारगृहे…

खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या ५०% क्षमतेने पुढील अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे.

उपहारगृह/बारमध्ये प्रवेश करताना प्रतिक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधित मास्कचा वापर अनिवार्य राहील. या बाबतच्या स्पष्ट सूचना आस्थापनाने लावणे आवश्यक राहील.

आचारी, वाढपे, व्यवस्थापक, स्वच्छता कर्मचाऱ्यांसह सर्वांचे लसीकरण आवश्यक राहील. त्याचबरोबर मास्कचा वापर अनिवार्य राहील.

वातानुकूलित उपहारगृह/बार असल्यास वायूविजनासाठी खिडक्या असल्यास कमीत कमी दोन खिडक्या किंवा दरवाजा उघडा ठेवून आतील हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे आवश्यक.

प्रसाधनगृहातही उच्च क्षमतेचा एक्झास्ट पंखा आवश्यक.

शारीरिक अंतराचे पालन करणारी आसन व्यवस्था आवश्यक.

निर्जंतुकीकरणाची तसेच सेनिटायझरची व्यवस्था आवश्यक.

सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात येत आहे. भोजनासाठी ग्राहकांकडून शेवटची मागणी रात्री ९ वाजेपर्यंत घ्यावी. मात्र, पार्सल सेवा २४ तास सुरु ठेवण्यास मुभा.

वातानुकुलित तसेच विनावातानुकुलित जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून स्पा 50 टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. इनडोअर स्पोटर्स असलेल्या ठिकाणी खेळाडूंचे व तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवस झालेले असणे आवश्यक राहील. तसेच, या ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी योग्य वायुविजन व्यवस्था असणे आवश्यक राहील. या ठिकाणी खेळाडूना बॅडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वॅश, पॅरलल बार, मलखांब अशाच खेळांसाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत सुरु करण्याची मुभा देण्यात आली आहे.

सर्व शासकीय / निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे व म्युनिसिपल कर्मचारी व व्यवस्थापन यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्यात यावे. ज्या खाजगी व औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचा-यांचे व व्यवस्थापनांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झालेले असेल त्या आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो विविध सत्रात कर्मचा-यांना बोलावून कामाचे व्यवस्थापन करावे. ज्या आस्थापना वरील कर्मचा-यांना घरून काम करणे शक्य आहे अशा सर्व आस्थापनांच्या व्यवस्थापनांनी कर्मचा-यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी.
खाजगी कार्यालयाना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये 24 तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. एका सत्रात कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या 50 टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक राहील.

उद्याने सर्व दिवस विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेत सुरु राहतील. सर्व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र / क्लासेस ( Coaching मlasses ) / अभ्यासिका हे सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने सुरु राहतील. या ठिकाणी प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांचे लसीकरण ( किमान एक डोस) अनिवार्य आहे. क्षेत्रिय अधिकारी यांनी स्थानिक परिस्थितीप्रमाणे आठवडे बाजार सुरु करण्यास परवानगी द्यावी.

विवाहसोहळे…

खुल्या प्रांगणातील, लॉनवरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे आसन व्यवस्थेच्या ५०% क्षमतेने व कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे संपूर्ण पालन होईल, या अटीवर मुभा.

खुल्या प्रांगण, लॉनवरील विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५०% परंतु, जास्तीत जास्त २०० व्यक्ती या मर्यादेत असेल.
बंदिस्त मंगल कार्यालये, हॉटेलमध्ये क्षमतेच्या ५०% परंतु, जास्तीत जास्त १०० व्यक्ती.

कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे, याची खातरजमा करण्यासाठी व्हीडीओ रेकाँर्डींग करणे व आवश्यकतेनुसार संबंधित प्राधिकाऱ्याला उपलब्ध करुन देणे आवश्यक. निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडनीय कारवाई तसेच परवाना रद्द करण्याची कार्यवाही.

मंगल कार्यालय, हॉटेल, लॉन, भोजन व्यवस्थापन, बँड पथक, भटजी, फोटोग्राफर्स अशा विवाह संस्थेशी संबंधित सर्व संलग्न संस्था यामधील व्यवस्थापक व कर्मचारी यांचेही लसीकरण आवश्यक.

आठवडे बाजार…

चालू करण्यास मंजुरी. विक्रेत्यांचे लसीकरण गरजेचे.

स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र / क्लासेस (Coaching classes) / अभ्यासिका…

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र / क्लासेस ( Coaching classes ) / अभ्यासिका हे सर्व दिवस रात्री १०.०० वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. (सदर ठिकाणी प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांचे लसीकरण किमान एक डोस) अनिवार्य आहे.

सिनेमागृहे व मल्टीफ्लेक्स….

सिनेमागृहे, नाट्यगृहे, मल्टिफ्लेक्स (स्वतंत्र तसेच मॉलमधील) पुढील आदेशापर्यंत बंद.

धार्मिक स्थळे…

पुढील आदेशापर्यंत बंद.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.