लिफ्टमधून जाणार्‍या १६ वर्षाच्या मुलीचा विनयभंग ; एकाला अटक

पुणे :  आईबरोबर लिफ्टमधून जाणार्‍या १६ वर्षाच्या मुलीचा विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी खडक पोलिसांनी एका 20 वर्षाच्या तरुणाला अटक केली आहे. हा प्रकार गंज पेठेतील पीएमसी कॉलनीमध्ये शुक्रवारी रात्री दहा वाजता घडला. याप्रकरणी एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे.

ही मुलगी पीएमसी कॉलनीमधील इमारतीतील लिफ्टमधून आईसमवेत तळमजल्यावरुन 6 व्या मजल्यावर जात होती. यावेळी लिफ्टमध्ये आलेल्या तरुणाने आईच्या देखत या मुलीचे केस ओढून तिच्या शरीरावर हात फिरवून जवळ ओढून विनयभंग केला. खडक पोलिसांनी  या तरुणाला अटक केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.