अमृतमहोत्सवी स्वतंत्रदिनानिमित्त पिंपरीगावात स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वाळुंजकर यांस मानवंदना व कोरोना योद्धाचा सन्मान

पिंपरी चिंचवड : आज भारत स्वातंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत.या अमृतमहोत्सवी वर्षी पिंपरी गावातील वाळुंजकर वाडा येथे स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वाळुंजकर यांस मानवंदना देऊन व कोरोना योद्धांना सन्मानपत्र देऊन अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले.

पिंपरी गाव येथे स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वाळुंजकर प्रतिष्ठाणच्या वतीने २२ कोरोना योद्धांना कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड एस बी चांडक (अध्यक्ष इंद्रायणी बँक ली),  प्रमुख पाहुणे गुरुवर्य माऊली महाराज वाळुंजकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक संदीप वाघेरे, मा उपमहापौर प्रभाकर वाघेरे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कोरोना काळात उल्लेखनीय कार्यरत असलेले रक्तमित्र संजय गायके यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

 

यावेळी माहिती देताना कार्यक्रमाचे वक्ते इतिहास संशोधक रविंद्र जगदाळे म्हणाले, स्वातंत्र चळवळीत पिंपरी चिंचवड मधील “सर्व स्थानिक स्वा सैनिकांनी त्याकाळात जीवाची पर्वा न करता मुंबई पासून पुण्याला येणारी विद्युत वहिनी पाडून पुण्यातील इंग्रजांचे कामकाज बंद पाडले. यानंतर इंग्रजांनी स्वा सैनिकांची माहिती देणाऱ्यास मोठे बक्षीस ठेवले, पण स्वातंत्र्य चळवळीची लाट असल्याने हे शक्य झाले नाही. या स्वातंत्र्य चळवळीत बाळकृष्ण पुराणिक, मिरजकर, रामभाऊ काटे, निवृत्ती वाळुंजकर यांचा प्रामुख्याने समावेश होता. तसेच इंग्रज चौकी समोर राष्ट्रगीत म्हणणं, नागरिकांचे संघटन करणं” अश्या सर्व केलेल्या कार्याची माहिती दिली. पुढे बोलताना ते म्हणाले,आजच्या युवकांनी स्वातंत्र सैनिकांना आदर्श मानले पाहिजे आणि देश विकासासाठी पुढे आले पाहिजे.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड एस बी चांडक म्हणाले,देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष झाले आहे. आज जी देशाची प्रगती, विकास आपण पाहत आहोत यामध्ये या स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान मोठे आहे. त्यांचे बलिदान त्याग आहे म्हणूनच आपण आज आहोत. आजच्या दिवशी कायम त्या देशभक्तांचे कार्य स्मरणात ठेवून सर्व समाज एकत्र होइल ही आशा आहे.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, स्वातंत्र्याची मशाल पिंपरी चिंचवड मधून व स्वातंत्र्य सैनिकांचे वास्तव्य पिंपरी गावामध्ये याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तसेच स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वाळुंजकर यांच्या कार्याची माहिती दिली.

या प्रसंगी नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले, स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वाळुंजकर हे सरपंच असताना त्यानी पिंपरी गाव ते पिंपरी कॅम्प या पहिला रस्ताचे काम केले, तसेच सामान्यांना शिक्षण घेता यावे या करिता रयत शिक्षण संस्थेचे नवमहाराष्ट्र विद्यालय उभारले. गावात पाणी पुरवठा व इतर सामाजिक कार्याची माहिती देऊन मनोगत व्यक्त केले.

यावेळी भाजपा नेते विशाल वाळुंजकर, गणेश वाळुंजकर, अमित माटे, योगेश वाळुंजकर, किरण वाळुंजकर, सौरभ वाळुंजकर, प्रसाद वाळुंजकर, महाराष्ट्र क्राईम वॉचचे कार्यकारी संपादक संकेत वाळुंजकर, युवा उद्योजग सुमित माटे, अजित माटे, अभाविप जिल्हा संयोजक गौरव वाळुंजकर, गिरीश वाळुंजकर, दर्शन रायकर, सुजल वाळुंजकर, साहिल वाळुंजकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी वाळुंजकर यांनी केलेे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.