कंपनीत गोळीबार करुन लूटणार्या दोघांना अटक ; गुन्हे शाखा युनिट एकची कामगिरी
पुणे : कंपनीत घुसून गोळीबार करत व्यवसायीकाला लूटणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्यांना लोणीकाळभोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्वप्नील लहु साठे (19, रा. शिवणे, पुणे)आणि अक्षय यादवराव काकडे(21 रा. शिवणे, पुणे) असे अटक आरोपींची नावे आहेत.
लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत अज्ञात आरोपींनी बंदुकींतुन गोळीबार करुन एका व्यावसायीकाला त्याचा कंपनीत रात्रीच्या दरम्यान येवुन लुटल्याची घटना नुकतीच घडली होती सदर घटना घडताच वरिष्ठांनी सदर गुन्हा करणा-या अज्ञात आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक करणे बाबत आदेशित करण्यात आले होते
या घटनेचा समांतर तपास दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक करीत होते. दरम्यान दि.15 ऑगस्ट रोजी दरोडा पोलीस अंमलदार पोलीस नाईक मॅगी जाधव व धनंजय ताजणे यांना खबर मिळाली की गुन्हयातील आरोपी हे शिंदे पुल चौक, दांगट इस्टेट जवळ, शिवणे, येथे गुन्हयातील चोरीस केलेला मोबाईल विकण्यासाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचुन दोघांना ताब्यात घेतले. त्यांचे अजुन एका साथिदार कार्तिक इंगवले यांचे सह केला असल्याची कबुली दिली.
त्यांचेकडे गुन्हयात चोरलेला मोबाईल मिळून आला आहे. त्यांचा साथीदार कार्तिक इंगवले याला यापुर्वीच युनिट -1 यांनी उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल आर्म ऍक्टमध्ये अटक करण्यात आली असून सदर गुन्हयाचा तपास उत्तमनगर पोलीस स्टेशन करीत आहेत.
सदरची कामगिरी उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-1 वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, सहायक पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर, सहायक फौजदार शाहिद शेख, पोलीस हवालदार निलेश शिवतरे, पोलीस नाईक मॅगी जाधव, धनंजय ताजणे, प्रमोद मोहिते, गणेश ढगे, गणेश पाटोळे व पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे, श्रीकांत दगडे, ऋषिकेश कोळप यांच्या पथकाने केली.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!