पिस्तूल दुकानात आणल्याच्या वादातून १६ वर्षीय मुलाची गोळी झाडून हत्या, रहाटणीतील धक्कादायक घटना
पिंपरी चिंचवड : पिस्तूल दुकानात का आणलंस?, तु येथुन जा नाहीतर मी तुझी कंप्लेंट पोलीसांत करेन. असे म्हणल्याचा राग आल्याने १६ वर्षीय तरुणाची गोळी झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि. 15) रात्री शिवराजनगर येथे घडली.याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
ओवेज इसाक इनामदार (वय १६ वर्षे, रा. के/ऑफ पांडुरग पोपट
सांडभोर याचे भाडयाची खोली,सांडभोर पोल्ट्री फार्म शेजारी,
विजयनगर,काळेवाडी,पुणे) असे खून झालेल्या मुलाचे नाव असून किरण शिवाजी वासरे (रा.रहाटणी पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी इसाक इस्माईल इनामदार (वय ४० , रा. सांडभोर पोल्ट्री फार्म शेजारी, विजयनगर, काळेवाडी, पुणे ) यानी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवराजनगर स्वामी समर्थ मंदीर समोर,रहाटणी येथे मयत ओवेज याच्या मामाचे एक्सपर्ट मोबाईल शॉपी नावाचे दुकान आहे. दुकानाचे मालक स्वतः डिलिव्हरी देण्याचे देखील काम करतात.रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास दुकानदार हिंजवडी येथे मोबाईल साहित्याची डिलिव्हरी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी दुकानदार मामाने ओवेज याला दुकानात थांबवले होते. त्यावेळी आरोपी किरण दुकानात आला व मोबाईलचा चार्जर कॉड मागितला त्यावेळी त्याचे जवळ बंदुक आणली होती.
त्यामुळे मृत ओवेज आरोपीस म्हणाला इथं पिस्तूल कशाला आणलंस?, तु येथुन जा नाहीतर मी तुझी कंप्लेंट पोलीसांत करेन. त्यामुळे आरोपीस राग आला आणि त्याने मृत ओवेज यास शिवीगाळ व दमदाटी केली व कोणताही विचार न करताच ओवेजवर त्याच पिस्तूलातून गोळी झाडली. गंभीर जखमी झालेल्या ओवेजचा मृत्यू झाला.
अगोदर हा प्रकार चुकून गोळी सुटल्याचा वाटत असतानाच तपासामध्ये हा खून असल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणी किरणला वाकड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून संबंधित घटनाक्रम त्याने पोलिसांना सांगितला आहे. अवघ्या १६ व्या वर्षी ओवेजला आपला जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
आरोपी मोबाईल चार्जर मागण्यासाठी दुकानात आला. आरोपी वारंवार दुकानात येऊन चार्जर मागत असे. त्यानंतर चार्जर घेऊन जात व त्याचे पैसे देत नसे. तो गुंड प्रवृत्तीचा असल्याने दुकानदार देखील त्याला जास्त विरोध करत नव्हते.रविवारी रात्री तो पुन्हा.दुकानात आला. त्याने चार्जर मागत ओवेज याच्यासोबत बाचाबाची केली. त्यावेळी ओवेजने दुकानदार मामाला फोन करून याबाबत सांगितले.
त्यावेळी दुकानदाराने आरोपीला पटकन चार्जर देण्याबाबत सांगितले. दरम्यान आरोपीने ओवेज सोबत वाद घातला. तसेच त्याच्या कमरेचे एक गावठी पिस्तूल काढून त्यातून गोळी झाडत ओवेजचा खून केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीवर यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!