बांधकामावर पाणी मारत असताना शॉक लागून अल्पवयीन मुलीचा मृत्यू

कोल्हापूर : बांधकामावर पाणी मारत असताना शॉक लागून अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रंकाळा स्टँड परिसरात घडली आहे. काल सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. स्वातंत्र्य दिनीच ही घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत होती. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंकिता अनिल शेळके ( वय १५ रा. राजेंद्रनगर, सध्या रा. रंकाळा) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत महेश ब्रह्मदेव सोनवणे ( वय 35 रा. राजेंद्रनागर ) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बांधकाम व्यावसायिक संदीप संकपाळ ( रा. नागाला पार्क ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप संकपाळ हे बांधकाम व्यावसायिक आहेत.रंकाळा स्टँड परिसरात त्यांच्याकडून इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर नूतन अनिल शेळके या पाणी मारण्याचे काम करतात. बांधकामावरील वायरिंग खराब झाले असल्याची कल्पना त्यांनी संदीप संकपाळ यांना दिली होती. काल सकाळी अंकिता पाणी मारण्यासाठी गेली. तिने मोटारी सुरू करण्यासाठी बटन सुरू केले. यावेळी तिला जोरदार वीजेचा शॉक लागला, या धक्क्याने ती जागीच कोसळली. तिला उपचारासाठी रुग्णालायत नेले असता उपचारापूर्वीच ती मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान राजेंद्रनगर येथे शेळके कुटुंब अनेक वर्ष राहत होते. तेथे त्यांचा चांगला संपर्क आहे. अनिल शेळके त्यांचा काही वर्षापूर्वी मृत्यू झाला. त्यामुळे पत्नी नूतन व दोन मुली व एक मुलगा असा त्याचां परिवार काही दिवसांपूर्वी रंकाळा स्टँड येथे बांधकाम साइटवर वॉचमन म्हणून काम करत होत्या. काल 15 ऑगस्टला सकाळी दहाच्या सुमारास त्यांची मुलगी अंकिता शेळके हीने मोटार सुरू केली आणि शॉक लागून तिचा मृत्यू झाला. मात्र त्याकडे कोणीही गांभिर्याने पाहिले नाही.

ही माहिती समजताच तिचे नातेवाईक व राजेंद्रनगर मधील सामाजिक कार्यकर्ते सीपीआर हॉस्पिटल गेले. दुर्देवी घटना घडून बराच वेळ होऊन सुद्धा कोणतीही कारवाई व संबंधित मालकावर गुन्हा नोंद न झाल्याने ते संतप्त झाले. तेथे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. तसेच शवविच्छेदन विभागासमोर व सीपीआरच्या मुख्य प्रवेशद्वारजवळ गर्दी झाली. अखेर पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.