वडिलांच्या पंच्याहत्तरीनिमित्त मुलगी व जावयाकडून वृक्षारोपण

मंचर : भावडी येथील ग्रामस्थ शिवाजी भामाजी नवले यांची मुलगी वैशाली व जावई तुकाराम नामदेव वाटेकर (रा.काळूस, ता. खेड) यांनी श्री सौरंग्या डोंगर परिसरात ७५ वृक्षांची लागवड केली आहे. शिवाजी नवले यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि वसुंधरेचे सौंदर्य टिकवण्यासाठी वृक्षसंवर्धन केले पाहिजे. जास्त वर्ष टिकणारे भारतीय प्रजातीचे वृक्ष लावले पाहिजे.तसेच चिंचेच्या झाडापासून देवस्थानला कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन निर्माण होईल, असे मत वैशाली वाटेकर यांचे पती आणि प्रसिध्द उद्योजक तुकाराम वाटेकर यांनी व्यक्त केले. चिंचेच्या ७५ वृक्षांची लागवड केली आहे. वृक्षांची नीट वाढ व्हावी यासाठी ट्रीगार्डसह ठिबक सिंचनद्वारे पाणीचीही व्यवस्था केली आहे.

वडिलांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत मुलगी आणि जावयाकडून असा अभिनव उपक्रम राबवणे हे खरोखरच कौतुकास्पद आहे.
ऑक्सिजन देणार्‍या झाडांची लागवड करण्याचे काम प्रत्येकाने केले पाहिजे असं मत जि. प.सदस्य बाबाजी काळे यांनी व्यक्त केले

यावेळी भावडी गावचे सरपंच महेश नवले, मुलगा रवींद्र नवले मुलगी कुमुद अरगडे, सरपंच जगन्नाथ राक्षे, उपसरपंच शिंदे , उद्योजक रोहिदास पवळे, पोलीस पाटील गोरक्ष नवले, कोंडीभाऊ अरगडे, सौरंग्या देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, नातेवाईक आदी उपस्थित होते.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.