गांजाची तस्करी करणाऱ्या वाहनास सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले ; LCB पुणे ग्रामीण व नारायणगाव पोलिसांची संयुक्त कारवाई.
नारायणगाव : पुणे नाशिक रोडवर पेट्रोलिंग करत असताना पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला (LCB) एका वाहनांचा संशय आल्याने त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले असता, त्यामध्ये तब्बल 7 किलो गांजा मिळून आला आहे.
दीपक बच्चू तामचिकर (रा. धालेवाडी ता.जुन्नर जि. पुणे) असे या कार चालकाचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहाय्यक फौजदार सुनील
जावळे, प्रकाश वाघमारे, पोलीस हवालदार मुकुंद आयचीत, पोलीस शिपाई समाधान नाईकनवरे हे पुणे ते नाशिक रोडने पेट्रोलिंग करीत असताना नारायणगाव पोलीस स्टेशनचे हद्दीत हॉटेल गिरीजा जवळ त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक
सफेद रंगाच्या ब्रिझा गाडीमध्ये गांजा आहे. या बातमीच्या अनुषंगाने नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्याशी समन्वय साधत पोलीस स्टेशनचा स्टाफ व एलसीबी पथक यांनी सापळा लावत एक सफेद रंगाची मारुती सुझुकी ब्रिझा गाडी (MH 12 GH 4173) नंबर प्लेट असलेली भरधाव वेगात व रहदारीचे नियमाकडे दुर्लक्ष करून जोरात नाशिक बाजूकडे जाताना दिसली त्या चालकाची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्या गाडीला
पाठलाग करून हॉटेल गिरीजा समोर पकडले व गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये एकूण 6.915 किलोग्रॅम गांजा मिळून आला आहे.
त्याच्याकडून 1 लाख 15 हजार 775 रुपये किंमतीचा 6.915 किलोग्रॅम गांजा व अंदाजे 9 लाख रुपये किमतीची जुनी वापरती ब्रिझा गाडी असा एकूण 10 लाख 15 हजार 775 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीस वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी नारायणगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपी हा सराईत असून यापूर्वी त्याचेवर 03 गुन्हे दाखल आहेत.याप्रकरणी पुढील तपास हा नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे हे करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!