गांजा, चरस, हशिश तेल असे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या परराज्यातील तीन नागरिकांना अटक, गुन्हे शाखा 1 च्या अमली विरोधी पथकाची कामगिरी
पुणे : गांजा, चरस, हशिश तेल असे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या परराज्यातील तीन नागरिकांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा 1 च्या अमली विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून गांजा, चरस, हशिश तेल असा मिळून 3 लाख 23 हजारांचा अमली पदार्थ साठा जप्त करण्यात आला आहे.
नासिर नुरअहमद शेख (वय 30 रा. अमित अस्ट्रोनिया क्लासिक सोसायटी, वडाची वाडी, उंड्री मुळ रा. मडगाव गोवा), पुनित सतबीर कादयान (वय 35 रा. व्यंकटेशभुमी ब्लिस सोसायटी, उंड्री मुळ रा. बेरी, हरियाना), शरत विजयन नायर (वय 34 रा. रा. व्यंकटेशभुमी ब्लिस सोसायटी, मूळ रा. कृष्णानगर, चेन्नई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी सोमवारी (दि.16) हद्दीत गस्त घालत होते. पथकातील पोलीस शिपाई योगेश मोहिते यांना माहिती मिळाली की तीन परप्रांतीय लोक राहत्या घरामध्ये चरस गांजा व इतर अंमली पदार्थाची विक्री करत आहेत.या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन छापा मारला.व तिघांना ताब्यात घेतले.
आरोपी नासिर याच्या घरातून 1 किलो 600 गांजा, 03 ग्रॅम 100 मिली हशिश तेल, मोबाईल, इलेक्ट्रिक वजन काटा जप्त केला.
तर पुनित कादयान व शरत नायर यांच्या घरातून 3 किलो 500 ग्रॅम गांजा व 15 ग्रॅम 170 मिली ग्रॅम चरस , मोबाईल, इलेक्ट्रिक वजन काटा, रोख रक्कम 1 लाख 67 हजार असा एकूण 3 लाख 23 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.आरोपींविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी सुरेंद्रकुमार देशमुख, पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, एपीआय लक्ष्मण ढेंगळे, सुजीत वाडेकर, संदीप जाधव, राहूल जोशी, विशाल दळवी, पांडुरंग पवार, प्रवीण उत्तेकर, विशाल शिंदे, संदेश काकडे, रेहना शेख, नितीन जाधव, योगेश मोहिते यांनी केली.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!