दहशत माजवण्याकरिता गावठी पिस्टल व जिवंत काडतुस बाळगणा-या सराईतांना अटक, गुन्हे शाखा युनिट ६ ची कामगिरी

पुणे : दहशत माजवण्याकरिता गावठी पिस्टल व जिवंत काडतुस बाळगणा-या सराईतांना गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलीसांनी अटक केली आहे. मयुर भाऊसाहेब गायकवाड (वय २५ वर्षे, रा. सी.एन.जी पंपाजवळ,चिखली,जाधववाडी, पुणे) व ओंकार ऊर्फ विकी प्रकाश नाळे (वय २८ वर्ष रा. व्दारका विश्व सोसा, बिल्डींग, इंद्रायणीनगर, भोसरी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशत माजवण्याकरिता गावठी पिस्टल व काडतुस बरोबर बाळगणा-या मनोज साळवे टोळीतील साथीदार, मयुर गायकवाड व ओंकार नाळे हे सुयोगनगर ४ नंबर, भावडी वाघोली पुणे येथे येणार असुन त्यांच्याकडे पिस्टल असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे युनिट ६ च्या पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे तपास केला असता दोन्ही आरोपी हे पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या रेकार्डवरचे गुन्हेगार असुन त्यांनी सामान्य जनतेमध्ये दशहत माजविण्याकरिता गावठी पिस्टल व जिंवत काडतुस बाळगले असल्याचे कबुल दिली. आरोपी विरूध्द लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह-आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हेnअशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा श्रीनिवास घाडगे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे शाखा लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक श्री गणेश माने, सपोनि नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे व सुहास तांबेकर यांचे पथकाने केली आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.