दोन खुनातील फरार आरोपी कुख्यात गुंड स्थानिक गुन्हे शाखे कडून जेरबंद
पुणे : खेड मंचर भागात दहशत माजवणाऱ्या तसेच दोन खुनातील फरार आरोपी कुख्यात गुंडास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. पवन सुधीर थोरात (वय २२ रा. जुना चांदोडी रोड, ता. आंबेगाव, जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड मंचर भागात आरोपीवर दोन खुनाचे गुन्हे दाखल होते. सदर चे दोन्ही गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने गुन्हे उघडकिस आणून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचा सूचना पोलीस अधीक्षक यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार सदर गुन्ह्यांचा खेड मंचर परिसरात तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्ह्यातील फरार आरोपी तसेच खेड मंचर भागात दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुंड पवन थोरात हा मंचर परिसरात येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.त्यानुसार मंचर परिसरात सदर आरोपीचा शोध घेत असताना मंचर बस स्टँड येथे एक व्यक्ती संशयितरित्या फिरताना आढळला. त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे पूर्ण नाव पवन सुधीर थोरात असे सांगितले.सदर आरोपीची वैदकीय तपासणी करून पुढील तपासाकरीता मंचर पोलीस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधीकारी लंभाते यांच्या मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट,
सपोनि. नेताजी गंधारे,b पो. हवा. हनुमंत पासलकर, पो.हवा. विक्रम तापकिर, पो. हवा. दिपक साबळे, पो. हवा. राजू मोमीन पो. ना. संदिप वारे, पो. कॉ. अक्षय नवले, पो. कॉ. दगडू वीरकर
यांनी केली आहे
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!