पाटस दरोड्यातील आणखी एका आरोपीस अटक, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

पुणे : पोलीस असल्याची बतावणी करून एस टी चालकाला पाटस टोल नाक्याजवळ थांबवून चार कुरियर प्रवाशांकडून कोट्यवधींचा मुद्देमाल हिसकावून पोबारा केलेल्या दरोड्याच्या टोळीतील आणखी एकाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली आहे. 3 ऑगस्ट रोजी पाटसच्या हद्दीत ही घटना घडली होती.

हर्षद विलास मतकर (वय 23, रा. तळवडे ता. कोरेगाव, जि. सातारा) असे अटक आरोपीचे नाव आहे. यापूर्वीच या गुन्ह्यात तिघाना अटक केली असून त्यांच्याकडून 1 कोटी 54 हजार 540 किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.याप्रकरणी हितेंद्र बाळासाो जाधव (रा. वाघोशी, ता. फलटण, जि. सातारा) यानी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी व इतर ३ प्रवासी ३ ऑगस्ट रोजी लातूर ते मुंबई या एस.टी.बसमधून सोलापूर ते पुणे हायवे रोडने प्रवास करीत असताना चार आरोपींनी पोलीस असल्याची बतावणी करून एस.टी.बसला गाडी आडवी मारून पास असणारे फिर्यादी व इतर ३ व्यक्ती यांना खाली घेवून त्यांना मारहाण व दमदाटी करून त्यांच्याकडील रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा एकुण १ कोटी १२ लाख ३६ हजार ८६० रुपये किमतीचा मुद्देमाल लुटून पोबारा केला होता.

सदर गुन्ह्यातील इतर तीन आरोपी व गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मुद्देमाल यापैकी 1 कोटी 54 हजार 540 किमतीचा मुद्देमाल हा यापूर्वी पुणे ग्रामीण गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आला आहे.

सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस अधिक्षकानी स्थानिक गुन्हे शाखेला सदर गुन्ह्यातील इतर आरोपी व मुद्देमाल हस्तगत  करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा याचा तपास करत होती.

सदर गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषण वरून व गोपनिय बातमी दाराकडून बातमी मिळाली की, सदर गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी  हर्षद मतकर हा शिवापूर टोल नाका येथे येणार आहे. या बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टोलनाक्याजवळ सापळा रचून ताब्यात घेतले.

त्याच्याकडे तपास जेलानास्ता त्याने सदरचा गुन्हा केल्याबाबत कबुली दिली आहे. तरी त्याची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी यवत पोलीस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामती विभाग अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल दस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचेnपोलीस निरीक्षक पद्माकर घनवट,Nसपोनी सचिन काळे,
सहा. फौज. पंदारे, पो हवा. जनार्दन शेळके, पो. हवा. राजू मोमीन,
पो.हवा.अजित भुजबळ, पो. ना. थिगळे, चालक सहा.फौज. मुकेश कदम यांनी केली आहे,

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.