प्रसिद्ध व्यावसायिक नानासाहेब गायकवाड व त्याच्या कुटंबातील सदस्यासह ८ जणांवर पुणे पोलिसांची मोक्का कारवाई

पुणे : औंध परीसरातील प्रसिद्ध व्यावसायिक नानासाहेब गायकवाड ऊर्फ औंधचा भाऊ व त्यांच्या कुटंबातील सदस्य आणि इतर साथिदार यांच्या विरुद्ध पुणे पोलिसांकडून मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. परिसरात संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी ही टोळी गुन्हेगारी कुरापती करत असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर मोक्काची कारवाई केली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली “मोक्का’ची ४८ वी कारवाई आहे.

नानासाहेब शंकरराव गायकवाड ऊर्फ भाऊ, नंदा नानासाहेब गायकवाड ऊर्फ भाऊ, गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड (रा.सर्व एनएसजी हाऊस औंध पुणे),  सोनाली दिपक गवारे (वय ४० वर्षे), दिपक निवृत्ती गवारे (वय ४५ दोघेही रा. १२०४/१६, गजानन महाराज मंदीर, संभाजी बागेजवळ, शिवाजीनगर, पुणे), राजु दादा अंकुश ऊर्फ राजाभाऊ (रा.सर्वोदय रेसिडेन्सी, ए विंग, फ्लॅट नं.२,विशालनगर, पिंपळे निलख, पुणे कायम रा.मु.पो.भोकर, ता.श्रीरामपुर, जि.अहमदनगर पुणे), सचिन गोविंद वाळके, संदीप गोविंद वाळके दोघेही (रा.विधाते वस्ती औंध पुणे)अशी मोक्काची कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.

मोका कारवाई झालेल्या आरोपीवर बेकायदेशीर मार्गाने स्वतःस व इतर साथीदारांस आर्थिक फायदा मिळविण्या साठी पिडीत व्यक्तिस अवैधरीत्या व्याजाने पैसे देवून ते वसूल करण्यासाठी रीव्हॉल्व्हरचा वापर करून,हवेत गोळीबार करून,जिवे मारण्याचा प्रयत्न करून, हिंसाचार करणेची धमकी देवून आणि धाकदपटशा दाखवून जबरदस्तीने जमीनीच्या मालकी बाबतचे दस्तऐवज स्टॅम्प पेपर,लिहलेले व कोरे पेपरवर सहया व अंगठे घेणे अशा प्रकारच्या गुन्ह्याच्या पद्धतींची माहीती मिळाली आहे. त्यामध्ये व्याजाचे व्यवसायातुन लोकांच्या जागा व वाहने बळकावल्याची माहीती प्राप्त असुन अशा व्यवहारांतुन मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी संपत्ती जमावल्याचा संशय आहे.

मुख्य आरोपी नानासाहेब शंकरराव गायकवाड ऊर्फ भाऊ रा. एन.एस.जी हाऊस,औंध,पुणे याचे व त्याचे साथीदारां विरुध्द मागील काही वर्षाचे कालावधीमध्ये खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी व जबर दुखापतीसाठी पळवुन नेणे, दुखापत करणे, बेकादेशीर जमाव जमविणे, कट रचून बनावटीकरण करून फसवणूक करणे, डांबून ठेवणे, जिवे मारण्याची धमकी देणे, घातक अग्नीशस्त्र बाळगणे,अवैधरीत्या सावकारी करणे वगैरे गंभीर स्वरुपाचे गुन्हे पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रांमध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत.

मुख्य आरोपी नानासाहेब शंकरराव गायकवाड हा टोळीप्रमुख असून त्याने कुटुंबातील सदस्य व इतर विविध साथीदारांसह गुन्हे केले आहेत. तसेच स्वतःच्या अधिपत्याखाली,संघटीत गुन्हेगारी टोळी कुटुंबियांसह निर्माण केली आहे. प्रतिष्ठीत तसेच महत्त्वांच्या व्यक्तींसोबत संबंध प्रस्थापित करुन तसेच गरजु व्यक्तींना बेकायदेशीररित्या व्याजाने पैसे देवुन त्यांच्याकडुन बेकायदेशीररित्या मुद्दल व व्याज उकळण्यासाठी किंवा त्यांच्याकडुन जबदरस्तीने दस्तऐवज बनवुन त्यांचे स्थावर वा जंगम मालमत्ता बळकावुन त्यातुन अवैध आर्थिक फायदा करुन घेण्याचा उद्देशाने त्यातून बेहिशोबी संपत्ती जमा केली आहे.

लोकांच्या घर जमीन, शेतजमीन इतर मिळकत स्वतःच्या व कुटुंबातील साथीदारांच्या नावावर करुन जबरदस्तीने व बनावटरित्या दस्तऐवज तयार करुन त्यांचेकडुन स्वतःचा तसेच त्याचे गुन्हेगारी टोळीतील इतर सदस्यांचा आर्थिक फायदा व्हावा यासाठी आपल्या संघटीत टोळीची दहशत निर्माण केली आहे. त्याच्या अशा वागण्यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या मनामध्ये/प्रतिष्ठीत नागरिक,व्यवसायिकांच्या मनात भिती निर्माण होवुन भितीपोटी बहुतांश प्रतिष्ठीत नागरिक,व्यवसायिक, सर्वसामान्य नागरिक हे त्यांचेविरुध्द गुन्हेगारी कारवायांबाबत तक्रार देणेस धजावत नाहीत.

या अनुषंगाने पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ पंकज देशमुख यांच्या मार्फतीने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३(१)(ii), ३(२),३(४),३(५) चा अंतर्भाव करणेस महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम २३(१) (अ) अन्वये अंर्तभाव होणेबाबतची मंजुरी मिळणेकामी प्रस्ताव सादर केला असता अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण  यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३(१)(ii), ३(२), ३(४), ३(५) चा अंतर्भाव करणेचे आदेश पारीत केलेले आहेत.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त,पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपआयुक्त,परिमंडळ ४. पंकज देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त,विश्रामबाग विभाग बजरंग देसाई, समीर चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक चतुःश्रृंगी पोलीस ठाणे,श्रीमती.सुप्रिया पंढरकर, पोलीस उप निरीक्षक,चतुःश्रृंगी पोलीस ठाणे, व पोलीस स्टाफ यांचे पथकाने केली आहे.

 

 

 

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.